एक्स्प्लोर

म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प गटात नेतेमंडळी, अनेकांच्या भुवया उंचावल्या; आरक्षित घरांची संख्या किती?

म्हाडाच्या जाहिरातीनुसार, कॉलम 8 ते 21 मध्ये आरक्षित घरांची संख्या आणि कोणत्या प्रवर्गासाठी ते घर राखीव आहे, याची माहिती दिली आहे

मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) घर घ्यायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण मायानगरी मुंबईतील घरांच्या किंमती पाहता प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. त्यामुळेच, तुमच्या स्वप्नातील घर तुम्हाला मिळवून देण्यासाठी म्हाडा या गृहनिर्माण संस्थेकडून घरांची लॉटरी काढली जाते. नुकतेच म्हाडाने (Mhada) मुंबईतील महत्वाच्या प्रभागात 2030 घरांसाठी जाहिरात काढली आहे. त्यामध्ये, अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटात विभागणी केली असून या उत्पन्न गटानुसार उमेदवारांना घरासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये, अत्यल्प उत्पन्न गटामध्ये अर्जदाराचे वार्षित उत्पन्न 6 लाख रुपये देण्यात आले आहे. तर, उच्च उत्पन्न गटात 12 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत विविध प्रवर्गांसाठी राखीव जागाही आहेत. त्यामध्ये, आमदार-खासदारांनाही (MLA) राखीव घरं आहेत. 

म्हाडाच्या जाहिरातीनुसार, कॉलम 8 ते 21 मध्ये आरक्षित घरांची संख्या आणि कोणत्या प्रवर्गासाठी ते घर राखीव आहे, याची माहिती दिली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरक्षण गटनिहाय उपलब्ध सदनिकांच्या 17 नंबर कॉलममध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे, विधानसभेचे व विधानपरिषदेचे आजी-माजी सदस्य म्हणजे आमदार खासदार, माजी आमदार-खासदार यांनाही म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरांसाठी आरक्षित जागा आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटातूनही आमदार-खासदारांना घरे देण्यात येत आहेत. म्हणजेच, 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या गटातूनही आमदार-खासदारांसाठी घरे आरक्षित असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.  

लोकप्रतिनिधींना अत्यल्प, अल्प गटांत किती घरं ?

म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये माजी आमदार, खासदारांसाठीही घरे आरक्षित असून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटात एकूण 15 घरे माजी आमदार व खासदारांसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी, 14 घरे म्हाडाच्या मुंबईतील विविध ठिकाणी असून 1 घर हे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्यात येत आहेत. मुंबईतील 14 घरांपैकी 12 घरे अल्प गटातून आहेत. तर, 2 घरे ही अत्यल्प गटातून माजी आमदार-खासदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 1 घर अत्यल्प उत्पन्न गटातून देण्यात येत आहेत. 

उत्पन्न गटांचे वर्गीकरण कसे?

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक  असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील  पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. येथील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मात्र, अत्यल्प गटातही आमदार-खासदारांसाठी घरे आरक्षित ठेवण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण, आमदारांचा पगारच 2 ते अडीच लाख रुपये महिना एवढा आहे. मात्र, तरीही अत्यल्प गटातून आमदार-खासदारांना घरं मिळणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मात्र, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. त्यांना मध्यम, अल्प किंवा अत्यल्प गटातील घर विकत घेता येणार नाही. त्यामुळे, 25 ते 50 हजार पगार असलेल्यांना अल्प उत्पन्न गटातून घर मिळविण्यासाठी अर्ज करता येईल

30 लाख ते 7 कोटींपर्यंत घर

म्हाडाच्या जाहिरातीनुसार, पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द मुंबई येथील इमारतीत 210 स्क्वेअर फूट घराची किंमत तब्बल 29 लाख 37 हजार 266 रुपये एवढी आहे. तर, विक्रोळीतील घराची किंमत 35 लाख 81 हजार एवढी आहे. तसेच, विक्रोळीतील कत्रमवार नगर येथील 290 स्क्वेअर फूट घराची किंमत 38 लाख 11 हजार रुपये असून मुंबईतील अँटॉप हिल वडाळा, नुरा बझार, सीजीएस कॉलनीजवळील इमारातीमधील घराची किंमत ही सर्वात कमी आहे. येथील अंदाजे 290 स्वेअर फूटाच्या घरासाठी तब्बल 41 लाख 51 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर, अल्प कोट्यातील काही घरांच्या किंमती 50 लाखांच्याही पुढे आहेत. तर, उच्च उत्पन्न गटात ताडदेवमध्ये क्रिसेंट टॉवरमधील म्हाडाचे घर तब्बल 7 कोटी रुपयांना आहे.

हेही वाचा

सावधान... म्हाडाची फेक वेबसाईट आल्याने खळबळ; सायबर सेलकडे तक्रार, नागरिकांना महत्त्वाचं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget