एक्स्प्लोर

Mhada Mill Workers Home : गिरणी कामगारांनो लक्ष द्या...घरांसाठीची पात्रता निश्चितीबाबत म्हाडाने दिली मोठी अपडेट

Mill Workers : गिरणी कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी गिरणीमध्ये काम केल्याबाबत विहित केलेल्या 13 पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करताना म्हाडाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुंबई :  मुंबईतील गिरणी कामगारांसाठी  (Mill Workers) घरे देण्यासाठीच्या पात्रता निश्चितीबाबत आज मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) मोठी अपडेट दिली आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एक लाख 50 हजार 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता सुरू असलेले विशेष अभियान आता म्हाडा कार्यालयाजवळील (Mhada Office) वांद्रे पूर्व येथील (Bandra East) एमआयजी क्रिकेट मैदानासमोर (MIG Cricket Ground) असलेल्या समाज मंदिर हॉलमध्ये होणार आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत या ठिकाणी आपली कागदपत्रे जमा करावीत असे म्हाडाने आवाहन केले आहे. मुंबईतील 58 बंद अथवा आजारी गिरणी कामगारांना घरे देण्यात येणार आहे. 

गिरणी कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी गिरणीमध्ये काम केल्याबाबत विहित केलेल्या 13 पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने http://millworkereligibility.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा mill worker eligibility या मोबाईल ॲपद्वारे अपलोड केले असल्यास त्यांना प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हाडाने सांगितले आहे. ऑनलाइन सुविधेअंतर्गत अद्यापपर्यंत 900 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ http://millworkereligibility.mhada.gov.in वर कागदपत्रे अपलोड करण्याच्या  सुविधेचा लाभ घेत या अभियानात अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

पात्रता निश्चितीचे विशेष अभियान हे गिरणी कामगार, त्यांच्या वारसांना घरे देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या अभियानात सहभागासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून गिरणी कामगार व त्यांचे वारस म्हाडा मुख्यालयात येत आहेत. परंतु, कागदपत्रे सोईनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन यापैकी कोणत्याही एका प्रकारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध गिरणी कामगार यांना घेऊन प्रवास करत म्हाडा कार्यालयात येण्यापेक्षा कागदपत्र सादर करण्याकरिता ऑनलाइन सुविधा वापरावी असे आवाहन बोरीकर यांनी केले आहे.

गिरणी कामगार / वारसांनी खालीलपैकी जास्तीत जास्त कागदपत्रे सादर करावीत

1) गिरणी कामगारांचे ओळख पत्र ,
2) तिकीट नंबरची प्रत,
3) सर्विस प्रमाणपत्र ,
4) लाल पास,
5) प्रोव्हिडेंट फंड क्रमांक,
6) इ एस आय सी क्रमांक,
7) मिल प्रमाणपत्र प्रत,
8) हजेरी पत्र ,
9) लीव्ह रजिस्टर प्रत,
10) उपदान प्रदान आदेश ,
11) भविष्य निर्वाह निधि सेटलमेंट आदेशाची प्रत,
12) पगार पावती ,
13) आधार कार्ड आणि इतर तत्सम कागदपत्र

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget