एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई लोकल : तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : अभियांत्रिकी कामानिमित्त आज (रविवार, 6 ऑगस्ट) मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम या वेळेत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे तिन्ही रेल्वेमार्गांवरील लोकल सेवा नेहमीच्या वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील.
मध्य रेल्वे :
- मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत मेगाब्लॉक
- मुलुंडे ते माटुंगादरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक सकाळी 10.59 ते दुपारी 4.20 पर्यंत अप धीम्या मार्गावरुन चालवण्यात येणार
- डाऊन जलद मार्गावरील लोकलना सकाळी 10.8 ते दुपारी 2.42 दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबा देणार
- सर्व लोकल 15 मिनिटं उशिराने धावणार
- रत्नागिरी – दादर पॅसेंजर ट्रेन दिवा रेल्वेस्थानकापर्यंतच चालवली जाणार आणि तिथूनच परतीच्या प्रवासाला रवाना होईल
- नेरुळ ते पनवेल रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
- सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या वेळेत मेगाब्लॉकची कामं केली जातील.
- नेरुळ ते पनवेलवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहातूक सेवा सकाळी 11.1 ते दुपारी 4.26 पर्यंत बंद
- ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूकही सकाळी 11.4 ते दुपारी 4.4 पर्यंत नेरुळ ते पनवेल दरम्यान बंद
- पनवेल ते अंधेरी दरम्यानची वाहतूक देखील बंद
- दोन्ही मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते नेरुळ आणि ठाणे ते नेरुळ दरम्यान विशेष लोकल सेवा
- चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
- अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत मेगाब्लॉक असेल
- धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावरुन धावतील
- काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement