एक्स्प्लोर

एनआरसी मोर्चाच्या तयारीची बैठक दहा मिनिटात आटोपून राज ठाकरे बाहेर

सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मनसे 9 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं

मुंबई : राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीच्या समर्थनार्थ मनसेचा 9 फेबुव्रारी रोजी मुंबईत मोर्चा आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र अवघ्या दहा मिनिटांतच राज ठाकरे बैठक आटोपून रंगशारदा सभागृहातून बाहेर पडले. जनजागृतीसाठी मनसे आपला मोर्चा मुस्लीम बहुल भागातून नेण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान प्रकृती अस्वाथ्यामुळे राज ठाकरे उशिरा सभागृहात पोहोचले आणि पदाधिकाऱ्यांना सूचना करुन निघाले, अशी माहिती समोर येत आहे. मुंबईतील गोरेगाव इथे 23 जानेवारीला झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनासाठी मनसे 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची वांद्र्यातील रंगशारदा इथे सकाळी दहा वाजता बैठक बोलावली होती. राज ठाकरे साडेबाराच्या सुमारास रंगशारदा सभागृहात पोहोचले आणि त्यानंतर बैठकीत फक्त दहा मिनिटांची उपस्थिती लावून राज ठाकरे बाहेर पडले. राज ठाकरे यांना थ्रोट इन्फेक्शन झालं आहे. त्यासाठी त्यांची डॉक्टरांची अपॉईंटमेंट होती. त्यामुळे ते बैठकीला उशिरा पोहोचले. या बैठकीत राज ठाकरे यांनी दोन महत्वाच्या सूचना केल्या. एक म्हणजे मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका. कारण, तो मान बाळासाहेब ठाकरेंचा त्यांनी सांगितलं. तर, दुसरं म्हणजे पक्षाच्या झेंड्याचा मान राखा, कारण त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे, अशी माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली. मोर्चांना मोर्चातून उत्तर : राज ठाकरे मुंबईतील राज्यव्यापी अधिवेशनात हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत मनसे भगवीमय केल्यानंतर, राज ठाकरेंनी त्यांचा मोर्चा पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांविरोधात वळवला. सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मनसे 9 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. तसेच सीएए विरोधातील मोर्चांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चातून उत्तर देईल, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. संबंधित बातम्या

तुमचा धर्म तुमच्या घरात आचरणात आणा, मशिदींवरचे भोंगे कशाला हवेत?, राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा सूर

मी रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही, नाव न घेता राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

VIDEO | मराठी आणि हिंदू धर्माला धक्का लावाल तर अंगावर जाईन : राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget