एक्स्प्लोर

Measles Disease : मुंबईत गोवर लसीकरणाच्या जनजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला.  

Measles Disease Mumbai :  गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षामध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला.   मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली.  मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असेही सांगितले आहे. तसेच, जनमानसात लसीकरणाबाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर लोक प्रबोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. 

मुंबईत 164 बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील 61 रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले. लसीकरणासाठी ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच बालकांना अ जीवनसत्वचा डोस देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाची परिस्थिती चिंताजनक 

राज्यातील गेल्या चार वर्षातील गोवरच्या रूग्णांची परिस्थिती पाहता यंदाची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक 3 वेळा झाला. तर 2020 मध्ये ही संख्या 2 वेळा झाला. अगदी मागच्या वर्षापर्यंत म्हणजेच 2021 मध्ये गोवरचा उद्रेक केवळ एकदाच झालेला. मात्र, यावर्षी 2022 मध्ये गोवर उद्रेकाची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये 6421 संशयित रूग्ण आहेत. तर मुंबईत आठ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. 

ही बातमी देखील वाचा

Measles Disease : मागील तीन वर्षात सहा वेळा गोवरचा उद्रेक, यंदा मात्र कहरच! आतापर्यंत 26 उद्रेक, सध्याची परिस्थिती काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
Shaktipeeth Expressway : राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
Shaktipeeth Expressway : राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
Independence Day: स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर, पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी सुद्धा फॉर्म भरला; म्हणाले, अवयवदान इच्छा नोंदवणे जबाबदारी व्हायला हवी
अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर, पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी सुद्धा फॉर्म भरला; म्हणाले, अवयवदान इच्छा नोंदवणे जबाबदारी व्हायला हवी
Sudhakar Badgujar : नव्याने भाजपवासी झालेल्या सुधाकर बडगुजरांचा महाजनांसमोरच सीमा हिरेंवर निशाणा, नेमकं काय घडलं?
नव्याने भाजपवासी झालेल्या सुधाकर बडगुजरांचा महाजनांसमोरच सीमा हिरेंवर निशाणा, नेमकं काय घडलं?
जम्मू काश्मीरला आभाळ फाटून मृत्यूचं थैमान; आतापर्यंत 65 मृतदेह सापडले; माजी मुख्यमंत्र्यांना 500 जीव ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
जम्मू काश्मीरला आभाळ फाटून मृत्यूचं थैमान; आतापर्यंत 65 मृतदेह सापडले; माजी मुख्यमंत्र्यांना 500 जीव ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
Embed widget