Measles Disease : मागील तीन वर्षात सहा वेळा गोवरचा उद्रेक, यंदा मात्र कहरच! आतापर्यंत 26 उद्रेक, सध्याची परिस्थिती काय?
Measles Disease : यावर्षी 2022 मध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे.
Measles Disease : गोवर (Measles Disease) हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवरचा संसर्ग मुख्यत्वे 5 वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. यावर्षी 2022 मध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असेही सांगितले आहे. तसेच, जनमानसात लसीकरणाबाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर लोक प्रबोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यातील गेल्या चार वर्षातील गोवरच्या रूग्णांची परिस्थिती पाहता यंदाची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक 3 वेळा झाला. तर 2020 मध्ये ही संख्या 2 वेळा झाला. अगदी मागच्या वर्षापर्यंत म्हणजेच 2021 मध्ये गोवरचा उद्रेक केवळ एकदाच झालेला. मात्र, यावर्षी 2022 मध्ये गोवर उद्रेकाची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये 6421 संशयित रूग्ण आहेत. तर मुंबईत आठ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.
यावर्षी राज्यात गोवर उद्रेकाचे प्रमाण तब्बल सहा पटीने वाढले असून 26 वेळा गोवरचा उद्रेक झाला आहे. यापैकी मुंबईत 14, भिवंडीत 7 तर मालेगाव मनपा येथे 5 रूग्ण आढळले आहेत.
मुंबईत सर्वाधिक गोवर संसर्गाचा उद्रेक
राज्यात मुंबई, भिवंडी आणि मालेगावात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. यापैकी 74 रुग्ण गोवरचे हे कस्तुरबामध्ये आहेत. तर 2 रूग्ण आयसीयूमध्ये आहेत. लस न घेतलेल्या मुलांना गोवर झालेलं प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत 12 हजारांपेक्षा जास्त मुलांना लस दिली आहे. तर, ज्या मुलांनी लस घेतली नाही, त्या मुलांना गोवर झाला आहे त्या मुलांचं प्रमाण जास्त आहे.
काय आहेत गोवरची लक्षणं?
ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातील चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुखे लक्षणं आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमोनिया, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग असे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )