एक्स्प्लोर

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी; पीकविम्याच्या नव्या नियमाने गोची,अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत

Maharashtra Rain Farmers Crops loss: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, पीकविम्याचे नियम बदलल्याने शेतकऱ्यांना यापूर्वी मिळणारी मोठी आर्थिक मदत आता मिळू शकणार नाही.

Maharashtra Rain Farmers Crops loss: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या या शेतकरी (Farmers) कुटुंबांनी सर्वस्व गमावले आहे. त्यामुळे हे शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, यंदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पीकविम्याचे (Crops Insurance Scheme) पैसे मिळू शकणार नाहीत. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पीक विम्याच्या नव्या नियमानुसार या अतिवृष्टीतून (Heavy Rain) पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. नव्या नियमानुसार, कापणीअंतीच पीक विम्याचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आता एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे करुन त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित 721 कोटी रुपयांचा निधी येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होईल. ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्याचा अहवाल शासन दरबारी जमा झाला आहे. या महिन्यातील पंचनामे पाऊस ओसरला की पुढील आठ दिवसांत पूर्ण करु. जुलै महिन्यापर्यंतचा निधी आपल्याला मिळाला आहे, ऑगस्टचा काही निधी बाकी असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित या घटकांचा समावेश होता. यासाठी पूर्वी 30 टक्क्यांची मर्यादा होती. आता केवळ उत्पादन आधारित  नुकसान भरपाई मिळणार आहे व मर्यादा 50 टक्के आहे( तंत्रज्ञान व पीक कापणी.) पूर्वीच्या योजनेत आजच्या अतिवृष्टीसाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळाली असती  पण आता जुना नियम नसल्याने ती मिळणार नाही.

Rain crop loss compensation: नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी नोंदीप्रमाणे ई-केवायसी करुन घ्यावे. जेणेकरुन नुकसानभरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारकडून आलेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आमची एक टीम तालुका पातळीवर कार्यरत आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले असेल तर नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

बांधावर पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, दत्तात्रय भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती, यंत्रणेची लाज काढली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget