(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Protest : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतलेच नाहीत! अनेक आंदोलकांना नोटिसा
Maratha Protest : महाविकास आघाडी सरकारकडून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले, असं सातत्याने सांगण्यात येतं आहे. मात्र या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेलेच नाहीत अशी बाब आता समोर आली आहे.
Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभार मोर्चे, आंदोलनं करण्यात आली होती. या आंदोलनात सहभागी आंदोलकांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारकडून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत असं सातत्याने सांगण्यात येतं आहे. मात्र या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेलेच नाहीत अशी बाब आता समोर आली आहे.
कारण मुंबईमध्ये 2016 साली जी बाईक रॅली काढण्यात आली होती त्या प्रकरणी आता मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार, आमदार आशिष शेलार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, शिवसेनेचे आमदार भारत गोगावले, विनोद घोसाळकर, राजन घाग यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चा मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की आम्हाला तत्कालीन सरकारनं आणि सध्याच्या महविकास आघाडी सरकारने देखील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत अशी माहिती आम्हाला दिली होती मात्र प्रत्यक्षात हे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत हे स्पष्ट झालं आहे कारण नुकत्याच आम्हाला आझाद मैदानं पोलीस ठाण्याकडून कोर्टात हजर राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नोटिसा बजावण्यात आलेल्या सर्वांवर सोम्मया मैदानं ते सीएसटी दरम्यान बाईक रॅली काढून वाहतूक समस्या निर्माण करणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे या बाबींअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 4 वर्षात याबाबात आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आणि आता अचानक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Uttar Pradesh : गोरखपूरमध्ये योगींच्या विरोधात त्यांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्याची पत्नी; भीम आर्मीचे चंद्रशेखर आझादही मैदानात
- UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांनी आयोध्येतून निवडणूक लढवल्यास भाजपला फायदा होणार? पाहा सर्व्हे काय म्हणतोय
- Malegaon Blast : एटीएसकडून योगी आदित्यनाथांसह संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव, मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराचा गौप्यस्फोट