एक्स्प्लोर

Uttar Pradesh : गोरखपूरमध्ये योगींच्या विरोधात त्यांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्याची पत्नी; भीम आर्मीचे चंद्रशेखर आझादही मैदानात

Uttar Pradesh Assembly Election 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात आता त्यांचेच एकेकाळचे सहकारी असलेल्या उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी निवडणूक लढवणार आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गोरखपूरची लढत सर्वात रंगतदार आणि हायप्रोफाईल होणार असल्याचं स्पष्ट झालंय. सपचे नेते अखिलेश यादव यांच्या वहिनींनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता अखिलेश यादवांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गोरखपूर मधील राजकीय उत्तराधिकारी आणि दिवंगत नेते उपेंद्र शुक्ला यांच्याच पत्नीला समाजवादी पक्षाकडून तिकीट देण्यात आलं आहे. तसेच भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद  देखील गोरखपूरच्या राजकीय रिंगणात उतरले आहेत. 

उपेंद्र शुक्ला हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जायचे. पण त्यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं. आता त्यांच्याच पत्नीला समाजवादी पक्षाने तिकीट दिलं आहे, तेही चक्क मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच विरोधात. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे देखील गोरखपूरमधून लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याची चर्चा आहे.

योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी याच उपेंद्र शुक्ला यांना मिळाली होती. पण ते पराभूत झाले होते. 

अखिलेश यादव यांच्या वहिनींचा भाजप प्रवेश
दरम्यान, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या घरात मोठी फूट पडलीय. मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाईंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुलायम यांचे पुत्र प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अपर्णा यादव यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

मात्र त्यानंतर पुन्हा मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यांची स्तुती करून अपर्णा यांनी आपण कुटुंबासोबतच असल्याचे दाखवले होते. समाजवादाचे दुसरे नाव हे अखिलेश असल्याचे जाहीरपणे सांगत त्यांनी पक्षासोबत राहणार असल्याचा संदेश दिला होता. मात्र आता अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप फोडणाऱ्या अखिलेश यादव यांना भाजपने त्यांच्या घरातूनच मोठा दणका दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8  PM TOP Headlines 8 PM 11 March 2025Job Majha | भारतीय नौदलात नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? शैक्षणिक पात्रता काय?Jayant Patil : दादांना शरण गेल्याशिवाय मंत्र्यांना  पर्याय नाही, मी जुना खेळाडू आहे ...तर कपात  होणाSunil Shinde Statement On Walmik Karad : वाल्मिक कराडचे 'कर्म'काडं उघड, अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंच्या जबाबात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
Embed widget