Manoj Jarange Maratha Reservation LIVE: मोठी बातमी! कोर्टाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब, मनोज जरांगे पाटलांना तात्पुरता दिलासा
Manoj Jarange Patil Azad Maidan agitation Live Updates: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लाईव्ह अपडेटस्. मुंबई उच्च न्यायालयाकडून दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरुन आंदोलकांना हटवण्याचा आदेश.
LIVE

Background
Manoj Jarange Patil Maratha Reservation: आझाद मैदानात जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र न्यायालयाने आता प्रशासनाला अनेक निर्देश दिले आहेत. अशात आझाद मैदानातच आंदोलक थांबावेत, इतरत्र फिरू नये म्हणून आंदोलनच्या ठिकाणी आणखी मोठा नवीन मंडप उभारण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरुन आंदोलकांना दूर करण्याचे आदेश दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय - मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत - मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी - मान्य
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे - मान्य
प्रलंबित जात पडताळणीला मान्यता - मान्य
आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता - मान्य
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या अमान्य?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी - 1 महिन्याची मुदत
मराठा-कुणबी एकच शासन निर्णय - 2 महिन्यांची मुदत
परभणीत मराठा समाज बांधवांचा जोरदार जल्लोष
परभणीत मराठा समाज बांधवांचा जोरदार जल्लोष
फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष
मुंबईत त्रास झाला पण मनोज जरांगे आणि मराठे हटले नाहीत ज्याचा विजय झाला
मराठा समाज बांधवांना मानले देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे अजित पवारांचे आभार
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर परभणी मध्ये मराठा समाजाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला आहे परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी एकत्रित फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला या सर्व मराठा बांधवांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी
Pankaj Kshirsagar Choupal























