एक्स्प्लोर

Manohar Joshi : मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका, प्रकृती अत्यवस्थ, आयसीयूत उपचार सुरू

Manohar Joshi Health Update : मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital Mumbai) उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेत (Manohar Joshi Health Update). 

काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने  हिंदुजा रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना  हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नाहीत

प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. 

बंडानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट

शिवसेनेत बंड झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात, त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घ्यायला सुरूवात केली. आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही. त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहे हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. 

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे आहेत. त्यांचा जन्म 2  डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले.  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले.

गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांचा मुलगा उन्मेश हे बांधकाम व्यावसायिक असून आएलएफएस पैशाच्या व्यवहाराप्रकरणी त्यांची ईडीने चौकशी केली होती. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैंABP Majha Headlines :  8 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Embed widget