एक्स्प्लोर

Mankhurd Fire | मानखुर्दच्या मंडल परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल

मानखुर्दच्या मंडल परिसरात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई : मानखुर्दच्या मंडल परिसरात भीषण आग लागली आहे. याठिकाणी लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या परिसरात आग लागली आहे. त्याठिकाणी रहिवाशी लोकांची वस्तीदेखील आहे. नेमकी आग कशामुळे लागली त्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोळ पसरल्याचं पाहायला मिळत आहेत. मानखुर्द परिसरातील या ठिकाणाला कुर्ला स्क्रापयार्ड असंही म्हटलं जातं. येथे लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. तसेच एखाद्या ब्लास्टमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी लाकडाचे सामान मोठ्या प्रमाणावर ठेवलं जातं. दुपारी अडीचच्या दरम्यान आग लागली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजता आग लागली. याठिकाणाहून धुराचे लोळ बाहेर येत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव गेत आग विझवण्याचं काम सुरु केलं आहे. परंतु, कालांतराने आगीनं रौद्र रुप धारण केलं.

याप्रकरणी बोलताना स्थानिक आमदार अबू आझमी यांनी सांगितलं की, "याठिकाणी अनधिकृत व्यवसायामुळे दरवर्षी येथे आग लागते. यासंदर्भात आम्ही अनेकदा विधानभवनातही सांगितलं आहे. तसेच पत्रदेखील दिलं आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे इथे दरवर्षी आग लागते. तसेच मोठ्या प्रमाणावर आग लागते. त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे. अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून याची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे सरकार यासंदर्भात बेजबाबदार भूमिका घेत आहे असं मला वाटत आहे."

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget