एक्स्प्लोर
CCTV : ठाण्यात ‘टोच्याची’ दहशत, विचित्र प्रकार सीसीटीव्ही कैद
टोच्या मनोरुग्ण असून वडिलांसोबत भांडण करुन बाहेर पडला होता आणि त्या रागातून लहान मुलींना पेन टोचत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाणे : ठाण्यातील पाचपाखडीतल्या सरस्वती शाळेबाहेर विद्यार्थ्यांना टोचणाऱ्या टोच्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. ही व्यक्ती लहान मुलांना हेरुन त्यांना टोकदार वस्तू टोचतो. हा सर्व विचित्र प्रकार शाळेच्या परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या टोच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात पालकांना माहिती देताच पालकांनी नौपाडा पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांनी टोच्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. दरम्यान, हा टोच्या मनोरुग्ण असून वडिलांसोबत भांडण करुन बाहेर पडला होता आणि त्या रागातून लहान मुलींना पेन टोचत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पाहा व्हिडीओ :
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा





















