एक्स्प्लोर

मालेगाव ब्लास्ट केस | आरोपींच्या सततच्या गैरहजेरीवर कोर्टाची नाराजी

सबळ कारणाशिवाय गैरहजर राहणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याचा कोर्टाला अधिकार आहे, हे ध्यानात असू द्या, या शब्दांत कोर्टाने आरोपींच्या वकिलांना सुनावलं आहे.

मुंबई : मालेगाव ब्लास्ट केसमधील आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी कोर्टात हजेरी लावावी, असं म्हणत रिकाम्या कोर्टरुमकडे पाहत न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी खटल्यादरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केली. या सुनावणीसाठी सतत या ना त्या कारणाने जामिनावर बाहेर असलेले आरोपी सुनावणीसाठी गैरहजर असतात आणि मग त्यांचे वकील अनुपस्थितीचा अर्ज सकाळी 11 वाजता कोर्टापुढे सादर करतात. मात्र यापुढे 'सबळ कारणाशिवाय गैरहजर राहणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याचा कोर्टाला अधिकार आहे, हे ध्यानात असू द्या' या शब्दांत कोर्टाने आरोपींच्या वकिलांना सुनावलं आहे. दरम्यान मालेगाव ब्लास्ट केसमध्ये एनआयएला एटीएसच्या मदतीची गरज नाही, असं स्पष्ट करत खटला अधिक मजबूत करण्यासाठी एनआयएने आधीची तपासयंत्रणा असलेल्या एटीएसची मदत घ्यावी, यासाठी एका मध्यस्थाने केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर आता या अर्जाची आवश्यकता नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टात सुरु असलेल्या मालेगाव ब्लास्ट खटल्याची सुनावणी 20 मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांच्याविरोधात गंभीर आरोपांअंतर्गत खटला सुरु आहे. मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरण 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 100 जण जखमी झाले होते. मालेगावात एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रचल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

Embed widget