एक्स्प्लोर
अंधेरीतील मधू इंडस्ट्रियल इस्टेटला आग
अंधेरी पूर्वेतील मधू इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली आहे. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ही आग लागली.
मुंबई: अंधेरी पूर्वेतील मधू इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली आहे. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली, आगीत कोणी जखमी झालं आहे का, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
मधू इंडस्ट्रियल इस्टेट ही कंपनी अंधेरी पूर्वेकडील नगरदास मार्गावर आहे. सकाळी दहाच्या सुमारास इथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन लहान फायर इंजिन रवाना झाले.
7 मजली असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. इमारतीतील इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर यासारख्या उपकरणांमुळे आग अल्पावधित भडकली.
आग भडकल्यामुळे अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे.
अंधेरीतील मधू इंडस्ट्रियल इस्टेटला आगhttps://t.co/LzhEOOOFfQ pic.twitter.com/Nc8GE5PpvY
— ABP माझा (@abpmajhatv) September 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement