Majha Maharashta Majha Vision | हे सरकार म्हणजे, लिव्ह-इन रिलेशनशिप : देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकार हे कुटुंब आहे ते दुभंगलेलं आहे. याला कुटुंब म्हणूच शकत नाही. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना केलं आहे.
मुंबई : 'महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे दुभंगलेलं कुटुंब आहे. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे.', असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. तसेच त्यांनी या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजनही स्पष्ट केलं.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. सध्या महामारीचा काळा आहे, महामारीची लढाई सुरु आहे. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय. पण माझं एक ठाम मत आहे. देशाच्या पाठीवर अशा प्रकारचं सरकार कधीच चाललं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसनेही याप्रकारचं सरकार कधीही चालू दिलं नाही. त्यामुळे देशाचा राजकीय इतिहास हा महाराष्ट्रात बदलेलं, असं आतातही यांच्यात दिसत नाही.' पुढे म्हणताता ते म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे कुटुंब आहे ते दुभंगलेलं आहे. याला कुटुंब म्हणूच शकत नाही. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल आणि ज्या दिवशी हे सरकार पडेल त्यादिवशी आमच्यावर जबाबदारी येईल आणि आम्ही एक मजबूत सरकार महाराष्ट्राला देऊ.'
ठाकरे सरकार लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार असेल तर तुम्ही अजित पवार यांच्याबरोबर स्थापन केलेल्या सरकारला काय म्हणाल? त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'तो एक फसलेला प्रयत्न होता. त्यामुळे त्याला कुठलं नाव देता येणार नाही'
पाहा व्हिडीओ : हे सरकार म्हणजे, लिव्ह-इन रिलेशनशिप : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात, हेच समजत नाही : देवेंद्र फडणवीस
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' एबीपी माझाच्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासंदर्भातील आपलं व्हिजन स्पष्ट केलं. त्यावेळी बोलताना राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे हेच मला समजत नाही' , असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'सध्याचं सरकार म्हणजे एक ट्रेन आहे, अनेकदा ट्रेनला मागे इंजिन असतं, एक पुढे असतं, पण याला मध्येही एक इंजिन आहे. आणि तिघेही आपापल्या दिशेने ते इंजिन ओढत आहेत.', असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात, हेच समजत नाही : देवेंद्र फडणवीस
Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरेकोरोनामुळं उद्योजकांचं मोठं नुकसान, लवकरच विशेष पॅकेजची घोषणा : उद्योगमंत्री सुभाष देसाई
कुटुंबात देखील कुरबुरी होतातच, मात्र सरकारमध्ये अंतर्विरोध नाही : मंत्री बाळासाहेब थोरात