मुंबई : 14 जून 2020 ला सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. कारण सुशांत बॉलिवूडमधील एक मोठं नाव होतं. सुशांतकडे नेम आणि फेम हे दोन्ही होते. त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती, मात्र तरीसुद्धा सुशांतने उचललेल्या या पावल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आणि संपूर्ण बॉलीवुड हादरलं. मुंबई पोलीसांनी यासंदर्भात एडीआर (अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट) दाखल करून तपास सुरु केला. प्राथमिक तपासाच्या अनुषंगाने सुशांतने डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. घटनास्थळावर पोलिसांना सुसाइड नोटही सापडली नाही जेणेकरून काही स्पष्ट होईल.


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जातीने या प्रकरणांमध्ये लक्ष घातल असून हा तपास सीबीआयकडे न देण्याचं स्पष्ट केलं, त्याच बरोबर याचा राजकारण करू नये असे स्पष्ट वक्तव्य सुद्धा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.


गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्वीट :



गेल्या दीड महिन्याच्या तपासात मुंबई पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावा किंवा काही निकष न लागल्याने सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा नोंदवला आणि रियावर खळबळ जनक आरोप लावले. बिहारमध्ये गुन्ह्याची नोंद होताच बिहार पोलिसांचे 6 पोलीस कर्मचारी मुंबईत दाखल झाले. या 6 पैकी 4 पोलीस कर्मचाऱ्यांची SIT बनवण्यात आली. या SIT ने आपला तपास सुरु केला. सुरवातीला मुंबई पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत बिहार पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र नंतर तपास योग्य मार्गाने सुरु असून मुंबई पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत असल्याचं बिहारचे पोलीस अधिकारी गुप्तेष्टवर पांडे यांनी सांगितले.


सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस व्यावसायिक वैमनस्याच्या अनुषंगाने करत आहेत. आतापर्यंत चाळीस लोकांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला असून यामध्ये बॉलीवूडमधील मोठ्या नावांचाही समावेश आहे. तर बिहार पोलिसांची लाइन ऑफ इन्व्हेस्टिगेशन आर्थिक निकषांवर अवलंबून आहे. सुशांत आणि रिया यांच्यामधील आर्थिक व्यवहाराची तपासणी बिहार पोलीस करत आहेत. सुशांतची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा तपास आता ईडीकडूनही केला जात आहे.


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तपास योग्य दिशेने सुरु : एस. पी विनय कुमार तिवारी


बिहार पटना सिटी एस. पी विनय कुमार तिवारी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालू असून तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुपरव्हाईस करावा लागतो आणि म्हणून मुंबईमध्ये आल्याच त्यांनी सांगितलं. तसेच तपासा दरम्यान जी नवीन तथ्य समोर येतील त्या अनुषंगाने हा तपास पुढे जाईल, असं सुद्धा विनयकुमार तिवारी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणांमध्ये आता आणखी नवीन कोणती माहिती समोर येत आहेत. ते पण हा महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तूर्तास तरी या प्रकरणावरून राजकारण पेटल्याच नक्कीच स्पष्ट दिसत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :