पटना : सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटना येथील राजीवनगर पोलीस ठाण्यात रिया विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांना रिया विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Continues below advertisement


रिया चक्रवर्तीने सुशांतची फसवणूक केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. सुशांतला फसवून त्याच्याकडून पैसे उकळले आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पटना पोलिसांनी टीम मुंबईत दाखल झाली आहे.


सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची जवळपास 11 तास चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वी रियानेही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्य़ाची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.


संबंधित बातम्या