मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पूजा करण्यासाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये काढले गेले आहेत. तेसुद्धा फक्त 2019च्या 30 दिवसांत. 2019 म्हणजे गेल्याच वर्षी सुशांत सिंगच्या खात्यातून 14 जुलै ते 15 ॲागस्ट या 30 दिवसांत तब्बल लाखो रुपये पुजेकरता खर्च केले गेले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या कोटक महिंद्रा बॅंक खात्याचे स्टेटमेंट ABP माझाच्या हाती लागले आहेत, त्यातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.


सुशांतच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटनुसार तपशील :




  • 14 जुलै 2019 ला 45 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.

  • 2 ऑगस्ट 2019 ला 86 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.

  • 8 ऑगस्ट 2019 ला 11 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.

  • 15 ऑगस्ट 2019 ला 60 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.


वरील पैसे सुशांतने पुजे करता खर्च केले आहेत. हे पैसे नक्की पुजेकरताच काढले गेले होते का? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण सुशांतची बहिण ही मुंबईतच राहते आणि तिने बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सुशांतच्या घरी कधीच कोणती पुजा झाली नाही. तसं असतं तर सुशांत मला बोलला असता, पण त्याने कधीच कोणत्या पुजेचा विषय माझ्याकडे काढला नव्हता. त्यामुळे ही पुजा झालीये का? या वर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे है पैसे नक्की कोणत्या पुजेकरता काढण्यात आले होते? याचा तपास आता बिहार पोलीस करत आहेत.



सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दीड महिन्यापेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. मुंबई पोलीस व्यवसायिक वैमानस्यच्या अनुषंगाने तपास करत आहेत. तर बिहार पोलीस आर्थिक बाबींची चौकशी करत आहेत. 14 जून रोजी सुशांत सिंहने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्याच कारण डिप्रेशन सांगितलं जात होतं. मुंबई पोलिसांनी ADR (accidental death report) दाखल करून याचा तपास सुरु केला आणि 40 पेक्षा अधिक लोकांचा जबाब नोंदवला. ज्यामध्ये बॉलीवूड मधील दिग्गज नावांचा समावेश होता.


महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावा लागत नव्हता आणि म्हणून मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त करत सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती विरोधात आर्थिक फसवणूकीचा बिहारमध्ये गुन्हा नोंदवला. त्याच्यानंतर बिहारची एक पोलिसांची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आणि त्यांनी आपला वेगळा तपास सुरु केला. त्यानंतर आर्थिक फसवणुकीच्या अनुषंगाने ईडीने सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यामुळे मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस या दोघांची इन्वेस्टीगेशन लाईन वेगळी असून या प्रकरणात अजून कुठले नवीन अलगडे होतात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :