मुंबई : बिहारचे बहुतेक सर्वच पक्ष, त्यांचे नेते सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. सुशांतची खरंच हत्या झाली आहे का? किंवा सर्व आवाज फक्त आणि फक्त बिहार निवडणुकीच्या रणनीतीचा भाग आहे. सुशांत सिंह राजपूत बॉलिवूडचा अपकमिंग स्टार होता. त्याने आपल्या कष्ट आणि समर्पणाने बॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. हिंदी चित्रपट जगतात शून्यापासून नायकापर्यंतचा प्रवास करणारा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी असा धक्का दिला, जो त्याच्या चाहत्यांमध्ये कायम राहील. मायानगरीच्या चमकदार जगामध्ये काम करत असताना देखील सुशांतचा बिहार संबंध खूप जवळचा होता. सुशांतच्या याच बिहार कनेक्शन, त्याचा स्टारडम आणि मृत्यूचा वापर ॲाक्टोबर- नोव्हेंबरमध्ये बिहार निवडणुकीत करण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे.


कुणी सुशांतचा राजपूत असल्याचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे? तर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा आरोप करत सुशांतच्या मृत्यू ला मुद्दा बनवून बिहारी लोकांची सहानुभुती घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची तरुण फॅन फॉलोविंगची खुप जास्त आहे. त्यामुळे या कठीण काळात सुशांतसोबत जो असेल त्यांच्या सोबत तरुणाई असेल हे बिहारमधील राजकीय नेत्यांनी कळतंय.


सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल


सुशांतच्या आत्महत्येची बातमी मिळताच सुशांतच्या घरी बिहारच्या बड्या राजकरण्यांनी भेट दिली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला तर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, आरजेडीचे तेजस्वी यादव हे शोक व्यक्त करण्यासाठी सुशांतच्या घरी पोहोचले, तर एलजेपी नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोषींना लवकर अटक करण्याची मागणी केली.


चिराग पासवान यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून सुशांत सिंहच्या आत्महत्येप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण प्रकरणाची संक्षिप्त माहिती त्यांना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं की या प्रकरणाचा तपास पोलीस लवकरात लवकर पूर्ण करतील आणि जर कोणी दोषी असेल तर त्यांना सोडलं जाणार नाही.


चिरागबरोबरच बिहारचे विरोधी पक्षनेते आरजेडी युवा नेते तेजस्वी यादव यांनीही सुशांतच्या कुटुंबाची भेट घेतली आणि बिहारच्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पत्र लिहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. जनअधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव किंवा बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी सभा यांनी या विषयाची माहिती देण्यासाठी कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपा नेत्यांनी अगदी काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात बिहारमधील राजपूत मुलाच्या हत्येला आत्महत्या म्हणून संबोधण्याचा कट रचण्यात आला, असेही म्हणायला सुरुवात केली. बिहारमधील अनेक खासदार, आमदारांनी सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुरु केली.


वास्तविक सुशांत सिंह राजपूतचा बिहारच्या राजकारणाशीही विशेष संबंध होता. सुशांतसिंग राजपूत बिहार सहरसा इथले भाजपचे आमदार नीरजकुमार बबलू यांचा चुलत भाऊ होता. त्यांची वहिनी नूतन सिंह एलजेपीच्या बिहार विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. असंही म्हणतात की सुशांतला स्वतःही राजकारणात जाण्याची इच्छा होती.


सुशांतचा आमदार भाऊ यांनी माहिती दिली की त्याचं कुटुंब सरकारी अधिकारी, राजकारण आणि व्यवसायात आहेत. गेल्या वर्षी सुशांत बिहारमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने मला सांगितले की या वर्षाच्या अखेरीस राज्यात तो मोठ्या प्रमाणात काम करायला सुरूवात करणार आहे.


बिहारमध्ये जातीय राजकारणाचं बर्‍यापैकी वर्चस्व आहे. म्हणूनच केवळ कुटुंब आणि राजकारण्यांकडून सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत नाही, तर करणी सेना ही आता सुशांतच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीसाठी पुढे आले आहे. करणी सेना राज्यातील राजपुतांचे प्रतिनिधित्व करते, ज्या समाजातला सुशांत सिंह होता.


सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे की खून? सर्वच राजकीय पक्ष सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. बिहारमधील राजकरण्यांना मुंबई पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही, पण पोलिस खरोखरच राजकीय दबावाखाली तपास करत आहेत का? राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रश्नांची उत्तर भविष्यात योग्य वेळी मिळतील. पण यावेळी बिहार निवडणुकीत सुशांत हा एक मोठा मुद्दा असणार हे मात्र निश्चित.


संबंधित बातम्या