मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड विश्वात खळबळ माजली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची देखील याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. आता रियाने आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलला आहे. रियाने सुशांतसोबतचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे.


रिया चक्रवर्तीने बदलला आपला व्हॉट्सअॅप डीपी


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान रियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीच पोस्ट केलं नव्हतं. परंतु, व्हॉट्सॅपवर तिने सुशांतसोबत आपला डिस्प्ले फोटो ठेवला आहे. दरम्यान, सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस त्याच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. यादरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांसह, त्याने मित्र परिवार आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचीही चौकशी केली जात आहे. रिया चक्रवर्तीची जवळपास 11 तास मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.



रिया चक्रवर्तीची इमोशनल इन्स्टाग्राम पोस्ट


सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. अशातच त्याची मैत्रिण आणि कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतशी निगडीत आठवळींना पोस्ट करत उजाळा दिला आहे. रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मी आताही माझ्या भावनांचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. तूच तो व्यक्ती आहेस, ज्याने मला प्रेमात विश्वास दिला आणि प्रेमाची जाणिव करून दिलीस. तूच मला शिकवलसं की, कसं एखादं सोप समीकरण जीवनाचा अर्थ शिकवू शकतं. मी तुला वचन देते की, मी तुझ्याकडून प्रत्येक दिवस शिकली आहे. मला माहिती आहे की, तू सध्या अत्यंत शांतिपूर्ण जागेवर आहेस. चंद्र, तारे, गॅलेक्सी या सर्वांनी मोकळ्या मनाने एका भौतिकशात्र तज्ज्ञाचं स्वागत केलं असणार. तू स्वतः एक तारा बनला आहेस. मी आता त्या तुटणाऱ्या ताऱ्याची वाट पाहणार, आणि हे मागणार की, तू माझ्याकडे पुन्हा यावं. तू एक उत्तम व्यक्तीमत्त्व असणारा व्यक्ती होतास, ज्याला संपूर्ण जगाने पाहिलं आहे. मी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे आणि तू सुद्धा हेच सांगायचास की, आपलं प्रेम वेगळं आहे. तू सारं काही मोकळ्या मनाने करू शकतेस. आणि आता तू हेसुद्धा दाखवून दिलसं की, आपलं प्रेम एक इतरांसाठी उदाहरण आहे. तुला शांती मिळो सुशी, तुला गमावून आज 30 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन.'


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी


असं सांगण्यात येत आहे की, सुशांत सिंह राजपूत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत गेल्या एका वर्षापासून रिलेशनमध्ये होता. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही यावर्षाअखेरीस लग्न करणार होते. आत्महत्येपूर्वी सुशांतने रियाला फोनही केला होता, परंतु, तिने त्याचा कॉल उचलला नव्हता. अशातच सुशांतने उचललेल्या आत्महत्येच्या टोकाच्या पावलानंतर बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या मुद्द्यावर व्यक्त झाले होते. तसेच सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार्स आणि प्रोडक्शन कंपन्या जबाबदार असल्याची टीकाही करण्यात येत होती. बिहारमध्ये करण जोहर, एकता कपूरसह अनेक लोकांविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तसेच रिया चक्रवर्तीवरही सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप याचिकेत लावण्यात आला आहे.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पोलीस स्थानकात दाखल


दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर 6 जुलै रोजी दुपारी लॉन्च करण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल असं सांगण्यात आलं होतं. डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवरही सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहून त्याला श्रद्धांजली द्यावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य झालं नाही. या सिनेमात सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो लांबणीवर पडला. आता हा चित्रपट 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


अभिनेत्री दिव्या चौकसेचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी, मृत्यूपूर्वी लिहिली भावूक पोस्ट


काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास