मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 35 लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये सुशांतच्या कुटुंबियांसोबतच, त्याचे मित्र आणि बॉलिवूडमधील अनेक बड्या दिग्दर्शक, निर्मात्यांचाही समावेश आहे. आता असं सांगण्यात येत आहे की, वांद्रे पोलीस अभिनेता सलमान खानला समन्स जारी करुन चौकशी करू शकतात. दरम्यान, न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस सध्या सलमान खानची चौकशी करणार नाही. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, पोलिसांकडून सलमान खानच्या चौकशीचं वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे.

Continues below advertisement


पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची चौकशी केली होती. रेश्मा शेट्टी एक सेलिब्रिटी मॅनेजर असून तिने आतापर्यंत सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांसारख्या अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. असं सांगण्यात येत आहे की, सलमान खान आधी सुशांत सिंह राजपूतसोबत चित्रपट करणार होता. परंतु, काही कारणांमुळे हा चित्रपट टाळण्यात आला. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरपासूनच बॉलिवूडमधील नेपोटिझ्मचा मुद्दा गाजत आहे.


पाहा व्हिडीओ : संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?



पाच तास केली रेश्मा शेट्टीची चौकशी


रेश्मा बॉलिवूडमधील आघाडीच्या सेलिब्रिटी मॅनेजर्सपैकी एक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये रेश्माची जवळपास पाच तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अद्याप रेश्माच्या जबाबासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. रेश्माने सलमान खानची मॅनेजर म्हणून 2010 पासून 2018 पर्यंत काम पाहिलं. त्यानंतर ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मॅनेजर म्हणून काम पाहू लागली. तसेच तिने याआधी आलिया भट्ट आणि कतरीना कैफसाठीही काम पाहिलं आहे.


सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 लोकांची चौकशी केली आहे. त्यामध्ये सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांचाही समावेश आहे. मुकेश छाबडा यांचा चित्रपट 'दिल बेचारा' अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटात सुशांतसोबत स्किरन शेअर करणारी अभिनेत्री संजना सांघीची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. याव्यतिरिक्त चित्रपट दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.


महत्त्वाच्या बातम्या : 


आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी


काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास