एक्स्प्लोर

BMC रुग्णालयात चार बालकांच्या मृत्यू, विधानसभेत गदारोळ; विरोधकांच्या संतापानंतर सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Winter Assembly Session LIVE Updates : भांडुप येथील महानगरपालिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसुतिगृहामध्ये 4 दिवसात चार बाळांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.

Maharashtra Winter Assembly Session LIVE Updatesभांडुप येथील महानगरपालिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसुतिगृहामध्ये 4 दिवसात चार बाळांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सरकारनं या प्रकरणाशी संबंधित  अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा केली.  आरोग्य विभागाचे मेडिकल अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहमध्ये एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेफ्टीक इन्फेक्शनमुळे या मुलांचा मृत्यू झाला असल्याचा रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आलं होतं. आता रुग्णालयात आणखी तीन बाळ आहेत त्यांनाही असेच इन्फेक्शन झाल्याचे समोर आले आहे. 
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोलताना म्हटलं की,  महानगरपालिकेमध्ये असा प्रकार होत असताना का लक्ष दिलं नाही? दिवसा ढवळ्या हा खून झाला आहे. तात्काळ कारवाई करा. आणखी किती बालकांचा मृत्यू होणार आहे, अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केला. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्याने या विषयावर एकत्र यावा आणि चर्चा करावी.  हा गंभीर विषय आहे.  यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  सेफ्टीक शॉकमुळे ही घटना घडली आहे.  चार बालकांचा मृत्यू झाला आहे आणि एक बालक गंभीर आहे.  तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. 

यानंतरही काही निर्णय होत नसल्यानं विरोधकांनी गदारोळ केल्यानं काही वेळ सभागृह स्थगित करण्यात आलं  फडणवीस यांनी नंतर म्हटलं की, या बालकांच्या मृत्यूला जे जबाबदार असेल त्यांना तात्काळ निलंबित करा. हा गंभीर विषय आहे. मंत्री महोदय यांनी उभं राहून कारवाई करण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली.  

यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, विरोधी पक्षनेत्यांनी जी मागणी केली आहे यासंदर्भात सरकार गंभीर आहे. झालेली दुर्घटना गंभीर आहे. मात्र याची चौकशी करुन कारवाई करु.  दोषीवर कारवाई करु मात्र याची चौकशी करावी लागणार आहे. मात्र यावरही विरोधकांचे समाधान न झाल्यानं अखेर एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा केली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Embed widget