एक्स्प्लोर

शिवसेना, भाजप, काँग्रेसचे 11 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात

आमदार होण्यासाठी इच्छुक शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी व मनसे या पक्षांच्या विद्यमान 11 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

मुंबई : आमदार होण्यासाठी इच्छुक शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी व मनसे या पक्षांच्या विद्यमान 11 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 9 नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे, तर दोन नगरसेवकांनी बंडाचे झेंडे उभारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर समाजवादी पक्षाचे गटनेते व नगरसेवक रईस शेख यांना भायखळा मतदारसंघ सोडून पक्षाच्या आदेशानुसार मुंबईबाहेर भिवंडीत निवडणूक लढवावी लागत आहे. त्याचप्रमाणे भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या 6 माजी नगरसेवकांनीही या निवडणुकीत आपले नशीब आजमवायचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येही 4 माजी नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे, तर 2 माजी नगरसेवकांनी मात्र बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेना - भाजपला आपल्या बंडखोर आजी व माजी नगरसेवकांची समजूत काढत त्यांचे 'बंड' काहीही उपाययोजना करून अथवा अन्य पदांचे गाजर दाखवून 'थंड' करावे लागणार आहे. सुदैवाने वडाळा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात आक्रमक होत उमेदवारीसाठी आडून बसलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर व विदमान ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने त्यांनी अर्ज न भरता माघार घेतली. त्यामुळे एक बंडोबा अगोदरच थंडोबा झाल्याने सेनेने व भाजपाने विशेषतः कोळंबकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेले विद्यमान 11 नगरसेवकांची यादी 1. शिवसेना - रमेश कोरगावकर - भांडुप (प.) मतदारसंघ 2. शिवसेना - दिलीप लांडे - चांदीवली मतदारसंघ 3. शिवसेना - महापौर विश्वनाथ महाडेश्वर - वांद्रे (पूर्व) मतदारसंघ 4. काँग्रेस - आसिफ झकेरीया - वांद्रे (प.) मतदारसंघ 5. काँग्रेस- जगदिश अमीन कुट्टी - अंधेरी ( पूर्व) मतदारसंघ 6. मनसे - संजय तुर्डे - कलिना मतदारसंघ 7. समाजवादी पार्टी - रईस शेख - भिवंडी 8. अखिल भारतीय सेना - गीता गवळी भायखळा 9. भाजप - पराग शहा - घाटकोपर ( पूर्व) 10. राजुल पटेल या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. मात्र वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून त्या अपक्ष उमेदवार आहेत. 11. सुफीयान वनु हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. ते मानखुर्द - शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार आहेत. माजी नगरसेवकांनाही लॉटरी 1. शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघ 2. शिवसेनेतर्फे माजी नगरसेविका यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघात उमेदवारी 3. काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांना भांडुप (प.) मतदारसंघ 4. काँग्रेसतर्फे माजी नगरसेविका अजंता यादव यांना कांदिवली (पूर्व) मतदारसंघात उमेदवारी 5. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांना विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी 6. मनसेतर्फे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget