कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक; एकाच दिवशी 8381 रुग्णांना डिस्चार्ज
कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला आहे. आजच्या दिवसात तब्बल 8 हजार 381 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
मुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज कोरोनाच्या 2682 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 35 हजार 967 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11 दिवस होता तो आता 15.7 दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.38 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे.
जिल्हा पातळीवर कोविड टेस्टिंग लॅब उभारण्याची गरज नाही, राज्य सरकार भूमिकेवर हायकोर्टाची नाराजी
राज्यात 116 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- 58 (मुंबई 38, ठाणे 1, भिवंडी 3, नवी मुंबई 9, रायगड 2, मीरा-भायंदर 3, पनवेल 1, कल्याण डोंबिवली 1), नाशिक- 32 (जळगाव 17, नाशिक 3, मालेगाव 5, धुळे 7), पुणे- 16 (पुणे मनपा 13,सोलापूर 3), कोल्हापूर-3, औरंगाबाद- 5, अकोला- 2 (अमरावती 2) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 77 पुरुष तर 39 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 116 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 48 रुग्ण आहेत तर 55 रुग्ण हे वय वर्षे 40ते 59 वयोगटातील आहेत. तर 13 जण 40 वर्षांखालील आहे. या 116 रुग्णांपैकी 75 जणांमध्ये (65 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2098 झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 46 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे 16 मे ते 26 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 70 मृत्यूंपैकी मुंबई 16, जळगाव- 14, नवी मुंबई -9, धुळे -6, मालेगाव -5 , औरंगाबाद 3, भिवंडी-3, नाशिक -3, अमरावती -2, कोल्हापूर -2, मीरा भाईंदर -2, रायगड -2, सोलापूर -2 आणि 1 मृत्यू ठाणे येथील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (36,932), बरे झालेले रुग्ण- (16,008), मृत्यू- (1173), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(6), ॲक्टीव्ह रुग्ण- (19,745) ठाणे: बाधीत रुग्ण- (8638), बरे झालेले रुग्ण- (2729), मृत्यू- (172), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (5737) पालघर: बाधीत रुग्ण- (913), बरे झालेले रुग्ण- (280), मृत्यू- (23), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (610) रायगड: बाधीत रुग्ण- (999), बरे झालेले रुग्ण- (518), मृत्यू- (29), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टीव्ह रुग्ण- (450) नाशिक: बाधीत रुग्ण- (1070), बरे झालेले रुग्ण- (818), मृत्यू- (60), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (192) अहमदनगर: बाधीत रुग्ण- (96), बरे झालेले रुग्ण- (52), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (38) धुळे: बाधीत रुग्ण- (135), बरे झालेले रुग्ण- (70), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (49) जळगाव: बाधीत रुग्ण- (555), बरे झालेले रुग्ण- (263), मृत्यू- (69), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (223) नंदूरबार: बाधीत रुग्ण- (33), बरे झालेले रुग्ण- (20), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (10) पुणे: बाधीत रुग्ण- (7223), बरे झालेले रुग्ण- (3425), मृत्यू- (314), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (3484) सोलापूर: बाधीत रुग्ण- (769), बरे झालेले रुग्ण- (314), मृत्यू- (62), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (393) सातारा: बाधीत रुग्ण- (459), बरे झालेले रुग्ण- (145), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (298) कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (379), बरे झालेले रुग्ण- (87), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (288) सांगली: बाधीत रुग्ण- (104), बरे झालेले रुग्ण- (53), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (50) सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (21), बरे झालेले रुग्ण- (7), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (14) रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (216), बरे झालेले रुग्ण- (88), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (123) औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (1410), बरे झालेले रुग्ण- (959), मृत्यू- (65), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (386) जालना: बाधीत रुग्ण- (117), बरे झालेले रुग्ण- (32), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (85) हिंगोली: बाधीत रुग्ण- (143), बरे झालेले रुग्ण- (97), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (46) परभणी: बाधीत रुग्ण- (42), बरे झालेले रुग्ण- (1), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (40) लातूर: बाधीत रुग्ण- (108), बरे झालेले रुग्ण- (52), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (53) उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (64), बरे झालेले रुग्ण- (13), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (51) बीड: बाधीत रुग्ण- (46), बरे झालेले रुग्ण- (5), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टीव्ह रुग्ण- (41) नांदेड: बाधीत रुग्ण- (108), बरे झालेले रुग्ण- (82), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (20) अकोला: बाधीत रुग्ण- (537), बरे झालेले रुग्ण- (275), मृत्यू- (28), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टीव्ह रुग्ण- (233) अमरावती: बाधीत रुग्ण- (202), बरे झालेले रुग्ण- (117), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (69) यवतमाळ: बाधीत रुग्ण- (128), बरे झालेले रुग्ण- (92), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (36) बुलढाणा: बाधीत रुग्ण- (56), बरे झालेले रुग्ण- (29), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (24) वाशिम: बाधीत रुग्ण- (8), बरे झालेले रुग्ण- (6), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (2) नागपूर: बाधीत रुग्ण- (511), बरे झालेले रुग्ण- (342), मृत्यू- (9), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (160) वर्धा: बाधीत रुग्ण- (11), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (10) भंडारा: बाधीत रुग्ण- (25), बरे झालेले रुग्ण- (1), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (24) गोंदिया: बाधीत रुग्ण- (58), बरे झालेले रुग्ण- (3), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (55) चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (25), बरे झालेले रुग्ण- (9), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (16) गडचिरोली: बाधीत रुग्ण- (31), बरे झालेले रुग्ण- (5), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (26) इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (56), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (13), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (43) एकूण: बाधीत रुग्ण-(62,228), बरे झालेले रुग्ण- (26.997), मृत्यू- (2098), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(9),ॲक्टीव्ह रुग्ण-(33,124)
CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माध्यमातील संपादकांशी संवाद