एक्स्प्लोर

Maharashtra Politics MNS: ठाकरेंची 'महाप्रबोधन यात्रा', भाजपच्या 'जागर सभे'ला मनसेचं 'घे भरारी'मधून प्रत्युत्तर; महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

Maharashtra Politics MNS: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता मनसेनेदेखील तयारी सुरू केली आहे. 'घे भरारी' या सभांचे आयोजन मनसेकडून करण्यात येणार आहे.

Maharashtra Politics MNS: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election)पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray) राज्यात महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhan Yatra) सुरू असून दुसरीकडे भाजपच्यावतीने (BJP) मुंबईत 'जागर मुंबई'चा (Jagar Mumbaicha) अंतर्गत सभा सुरू आहेत. आता या दोन पक्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील (Maharashtra Navnirman Sena) मैदानात उतरणार आहे. मनसेच्यावतीने 'घे भरारी' सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या 2012 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवकांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतही मनसेला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आता मनसेकडून आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. 

मनसेकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'घे भरारी' सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभांमध्ये पक्षाचे नेते, सरचिटणीस मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीआधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी आणि त्यांच्यात उत्साह वाढवण्यासाठी या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'घे भरारी' संकल्पनेची लवकरच अधिकृत घोषणा होणार असून सभांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपकडून जागर मुंबईचा 

मागील मुंबई महापालिका निवडणुकीत थोडक्यात सत्ता गेल्यानंतर भाजपकडून यंदाच्या निवडणुकीत मुंबई काबीज करायची, असा चंग बांधला गेला आहे. भाजपकडून मुंबईत 'जागर मुंबईचा' या सभांचे आयोजन करण्यात येत असून शिवसेनेच्या नेतृत्वातील महापालिकेच्या कारभारावर टीका केली जात आहे. भाजपकडून अमराठी भाषिक विभागांसह मराठी बहुल भागांवरही लक्ष केंद्रीत केले जात आहे.  

शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी 

शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटासाठी आगामी मुंबई महापालिका निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्थानिक पातळीवरील शिवसैनिक हीच मोठी ताकद आहे. सध्या ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ही यात्रा राज्यभर सुरू असून राज्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अद्यापही ठाकरे गटाने मोठी घोषणा केली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यातून मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Full Speech Anna Bansode : पुरी हो गयी दादा की तमन्ना उपाध्यक्षपद पर बैठ गये अण्णाRam Kadam on Disha Salian : ठाकरेंची चौकशी करा, राम कदम आक्रमक; Nana Patole भिडले थेट सभात्याग केलाAjit Pawar on Anna Bansode : आण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, कौतुक करता करता गुपितच फोडलं!ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
Embed widget