एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : शिंदे गट मनसेत विलीन होणार? बाळा नांदगावकर म्हणाले...

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं आहे. कारण शिंदे गट मनसेमध्ये विलीन होण्याची चर्चा रंगली आहे. यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Maharashtra Political Crisisएकनाथ शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होणार का या मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलणं टाळलं. परंतु त्याने या मुद्द्याचं खंडन देखील केलं नाही. सध्या यावर आता भाष्य करणे घाईचे ठरेल, असं ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गट मनसेत विलीन होणार की नाही ही चर्चा कायम आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट अँड वॉचची भूमिका आहे, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

राजकीय सत्ता संघर्षात मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट ॲंड वॉचची भूमिका आहे. या घडीला यावर भाष्य करणे प्रीमॅच्युअर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पण सोबतच शिंदे गटाच्या मनसेत विलिनीकरणाच्या मुद्द्याचं खंडनही नाही.

MNS : उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, मनसेचा सल्ला

राज्याच्या सत्ता संघर्षात राज ठाकरेंची एन्ट्री
महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे गट आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना आणि सरकार वाचवण्यासाठी कसरत करत आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उतरले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी दोन वेळा फोनवरुन चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं.

शिंदे गट मनसेत विलीन होण्याची चर्चा का?
शिवसेनेचे बंडखोर आमदार राज ठाकरे यांच्या मनसेत सामील होऊ शकतात. त्यामागील कारण म्हणजे शिंदे यांना दोन तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजेच 37 आमदारांचा पाठिंबा असल्याने विधानसभेत वेगळ्या पक्षाची मान्यता मिळणे सोपं नाही. बंडखोर गटाला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपूर्वी या समस्येवर तोडगा काढायचा असेल, तर त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला कोणत्या तरी पक्षात विलीन करणं. अशा परिस्थितीत शिंदे गटाचा मनसेत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निर्णय राज ठाकरेच घेतील : आमदार राजू पाटील
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले की, "शिवसेनेचा जो गट फुटलाय तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. ते मनसेबरोबर आपला गट विलीन करणार आहेत किंवा नाही याबाबत आपल्याला माहित नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे बोलणे झाल्याबद्दल मी माध्यमातूनच ऐकलं, झालं असेल बोलणं, मला माहित नाही. पण शिंदे गटाने जो हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आहे तोच आम्ही मांडला होता त्यामुळे त्या मुद्द्यावर ते एकत्र येऊ शकतात. मात्र याबाबतचा निर्णय राज ठाकरेच घेतील.

Raj Thackeray आणि Eknath Shinde यांचं बोलणं झाल्याचं मी माध्यमातूनच ऐकलं : राजू पाटील

Eknath Shinde Raj Thackeray : एकनाथ शिंदे यांचा गट राज ठाकरेंच्या मनसेत होणार का विलीन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा..', अशोक चव्हाणांचा बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीला सल्ला, म्हणाले..
'महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा..', अशोक चव्हाणांचा बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीला सल्ला, म्हणाले..
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
Kolhapur News : कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVasrsha Gaikwad Mumbai : रिअल इस्टेट प्रकल्पाविरोधात काँग्रेसचं आंदोलनTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 22 ऑगस्ट 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा..', अशोक चव्हाणांचा बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीला सल्ला, म्हणाले..
'महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा..', अशोक चव्हाणांचा बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीला सल्ला, म्हणाले..
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
Kolhapur News : कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Aaditya Thackeray : '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
'2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
Health: ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ, तोंडात आंबटपणा या 4 पदार्थांनी हाईल दूर
ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ, तोंडात आंबटपणा या 4 पदार्थांनी हाईल दूर
Ayesha Takia Trolled : काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
Embed widget