Non Teaching Staff Agitation : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका, अनेकांच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या
Non Teaching Staff Agitation : राज्यभरात आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय त्यासोबतच पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून त्यांनी परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.
Non Teaching Staff Agitation : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना (HSC Exam) फटका बसला आहे. आंदोलनामुळे बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या आहेत. बारावी बोर्डाची लेखी परीक्षा अवघ्या आठ दिवसांवर आली आहे. मात्र अद्याप अनेक विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा न झाल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. लॅब असिस्टंट उपलब्ध नसल्याने प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायच्या कशा? असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा राहिला आहे.
राज्यभरात आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय त्यासोबतच पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून त्यांनी परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे एक फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झालेल्या असताना दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचारी या परीक्षांना कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याने आणि परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकल्याने प्रात्यक्षिक परीक्षांना या आंदोलनाचा मोठा फटका बसत आहे. यामुळे शिक्षकांना आणि बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे,
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
- महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी
- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
विद्यार्थ्यांसमोर पेच
बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अडचणी येत आहेत. बायोलॉजी, केमिस्ट्री फिजिक्स यासारख्या विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी लॅब असिस्टंटवर मोठी जबाबदारी असते. या आंदोलनामुळे लॅब असिस्टंट उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यात आठ दिवसांवर परीक्षा आलेली असताना अनेक विद्यार्थ्यांच्या तीन ते चार विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा अजूनही बाकी आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचं की लेखी परीक्षांचा अभ्यासाची तयारी करायची? अशा मनस्थितीत विद्यार्थी अडकले आहेत.
बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर परिणाम होणार नाही : मुंबई बोर्ड
बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई बोर्डाकडून देण्यात आलं आहे. अनेक महाविद्यालयातील प्रात्यक्षिक परीक्षा वेळेत पूर्ण झाल्या असून काही कॉलेजमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पूर्ण होतील. शिवाय, महाविद्यालयांना पूर्णपणे सहकार्य केलं जाईल असं मुंबई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे सहकार्य बोर्डाकडून मिळत नसल्याने प्राचार्य, शिक्षक हवालदिल झाले आहेत.
...तर लेखी परीक्षांनाही फटका
विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने या संदर्भात तातडीने लक्ष घालून योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. कारण 21 फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होत आहेत आणि त्यात सुद्धा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु राहिल्यास मोठा फटका लेखी परींक्षाना बसू शकतो
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI