Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त, आरामदायी होणार; जाणून घ्या मुंबई मेट्रो-3 ची वैशिष्ट्ये
Mumbai Metro 3 : मुंबईकरांचा प्रवास आता प्रदूषणमुक्त आणि आरामदायी होणार आहे. जाणून घ्या मुंबई मेट्रो-3 ची वैशिष्ट्ये...
![Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त, आरामदायी होणार; जाणून घ्या मुंबई मेट्रो-3 ची वैशिष्ट्ये Maharashtra news mumbai metro 3 trail run starts Know the features of Mumbai Metro-3 Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त, आरामदायी होणार; जाणून घ्या मुंबई मेट्रो-3 ची वैशिष्ट्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/c1647d1850ce14298987a60fc6fe3bbf1661848326238290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Metro 3 : मुंबईतील सार्वजनिक वाहकतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. मुंबईतील मेट्रो-3 मधील रेकची चाचणी आजपासून सुरू झाली आहे. मुंबई-3 मेट्रोचा मार्ग भुयारी असणार आहे. त्यामुळे या मेट्रोच्या चाचणीला मोठे महत्त्व आहे. ही चाचणी आरेतील सारिपूतनगर ते मरोळ नाका दरम्यानच्या तीन किमीच्या अंतरादरम्यान होणार आहे. मेट्रो-3 साठी खास नवीन 'मेट्रो कोच' मुंबई मेट्रोच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. मुंबई मेट्रोमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार असून वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के झाले आहे. भुयारी मार्गाचेही काम जोमाने सुरू आहे. काही स्थानकादरम्यानचे फोटो मुंबई मेट्रोने याआधीच शेअर केले आहेत.
>> मेट्रो-3 मुळे काय फायदा होणार, त्यावर एक नजर...
> मुंबई मेट्रो लाईन 3 च्या ट्रेन्स आठ डब्यांच्या आहेत. सुरुवातीपासूनच वाढत्या प्रवाशांची गरज पूर्ण करतील
> 75% मोटाराजेशनमुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील
> रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे 30% विद्युत ऊर्जेची बचत होईल. त्याशिवाय, चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज देखील कमी होईल.
> मेट्रो ट्रेनच्या डब्यांची रुंदी 3200मीमी असून उभे आणि बसलेल्या स्थितीत अंदाजे 2400 प्रवासी एका गाडीतून प्रवास करू शकतील.
> मेट्रो डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डाय ऑक्साईड आणि आद्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आहे. त्यामुळे सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.
> मेट्रो डब्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केल्यामुळे मेट्रोचे डबे किमान 35 वर्ष टिकू शकतील.
> प्रवाशांच्या सुलभतेसाठी विशिष्ट गर्दीच्या वेळेत मेट्रो कारच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे प्रवाशांना चढणे आणि उतरण्यासाठी दिलेले असतील.
पाहा व्हिडिओ : Mumbai Metro 3 ची EXCLUSIVE झलक, मेट्रो 3 ची सफर 'माझा'वर
>> मेट्रो-3 च्या चाचणीत काय पाहिले जाणार ?
> ट्रेन प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का याचा विचार होणार. त्याशिवाय, मध्यम आणि हाय वोल्टेजवर ट्रेनची चाचणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय, ब्रेकची क्षमता, एअर कम्प्रेसर, स्वयंचलित दरवाज्यांची कार्यक्षमता, वायुविजन याचीही चाचणी होणार आहे. मेट्रो-3 ची चाचणी ही भूमिगत चाचणी होणार आहे. मेट्रो-3 चा मार्ग भूमिगत असणार आहे.
> रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाईनची योग्यता सिद्ध करून आवश्यकतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अमलात आणण्यात याव्यात यासाठी मेट्रो लाईन तीनची चाचणी करणे आवश्यक आहे.
> आठ डब्यांच्या गाडीसाठी 85 किमी ते 95 किमी प्रति तास ही गती असणार आहे.
> 'ट्वीन बुटेड लो व्हायब्रेशन ट्रॅक हाय अटेंनयूएशन' असे नव्या प्रकारचे क्रॅक्स स्ट्रक्चर कोणत्याही भूमिगत मेट्रोसाठी भारतात प्रथमच स्वीकारले आहे.
> मेट्रोच्या चाचणीच्या सुरुवातीला आरेतील सारिपूतनगर ते मरोळ नाका सुमारे तीन किलोमीटर दरम्यान ट्रेन चाचणी सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)