Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, चार कंपन्या जळून खाक
Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली आहे.
![Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, चार कंपन्या जळून खाक Maharashtra Navi Mumbai Fire a huge fire broke out in Pavane MIDC fires Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, चार कंपन्या जळून खाक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/06/9e4627694d8221c936733cd9c6157cc3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. आज ( 6 मे) दुपारी ही आग लागली. आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यानंतर ही आग पसरली घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.घटनास्थळी गर्दी न करण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब या रासायनिक कंपनीला आग लागली आहे.ही आग इतकी भीषण आहे की, या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या आहे. कंपनी चार कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. मात्र अग्निशमन दलाकडून या वृत्ताल अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)