मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा पार
Mumbai Vaccination : मुंबईत 99 लाख 80 हजार 629 नागरिकांना पहिल्या मात्रा आज दुपारअखेर दिल्या गेल्या आहेत. तर दुसरा डोस 81 लाख 37 हजार 850 नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. या सर्व वातावरणात मुंबईबाबत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेन कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.
दोन वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. दोशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. तर मुंबईनो कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे.मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे 1 कोटी 81 लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे.
लसीकरणाचा वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये पहिल्या मात्रेचा विचार करता, 31 मे 2021 रोजी 25 लाख, 19 जुलै 2021 ला 50 लाख, 15 सप्टेंबर 2021 ला 75 लाख आणि 5 जानेवारी 2022 ला दुपारअखेर 1 कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला आहे.
देशासह मुंबईत 16 जानेवारीपासून राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचाऱ्यांसाठी 5 फेब्रुवारी, 60 वर्ष वयावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी 1 मार्च, 45 वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी 1 एप्रिल, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मे पासून लसीकरण सुरु करण्यात आले. नुकतेच 3 जानेवारी 2022 पासून वयवर्ष 15 ते 18 वयोगटातील तरुणांचे देखील लसीकरण सुरु झाले आहे.
लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरा डोस नी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Mumbai Corona Restriction : मुंबईची चिंता वाढली; दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ, लवकरच लॉकडाऊन?