Mumbai on Covid19 : दिलासा! मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही, आतापर्यंत नऊवेळा धारावी शून्यावर
कोरोनाचा हॉटस्पॉट (Coronavirus) असणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये (Dharavi) गेल्या 24 तासामध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
Dharavi Corona Update : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीकरांसाठी आज मोठा दिलासा देणार बातमी आहे. तब्बल 25 दिवसानंतर मंगळवारी (22 फेब्रुवारी) धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. या अगोदर 28 जानेवारीला धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. धारावीत सध्या पाच रुग्ण सक्रीय आहेत. त्यापैकी एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, . तर 4 रुग्ण एकतर घरात क्वारंटाईन आहेत.
आतापर्यंत नवव्यांदा धारावी शून्यावर
कोरोनाची पहिली लाट
- 25 डिसेंबर
- 22 जानेवारी
- 26 जानेवारी
- 27 जानेवारी
- 31 जानेवारी
- 2 फेब्रुवारी
कोरोनाची दुसरी लाट
- 14 जून
तिसरी लाट
- 20 डिसेंबर
- 28 जानेवारी
धारावीत 28 जानेवारीला धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. आतापर्यंत धारावीत 8643 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 8219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये लक्षवेधी प्रमाणात कमी झाली आहेत. मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळणं ही एक मोठी दिलासादायक बातमीच आहे. तब्बल 25 दिवसांनंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान धारावीतील दाट वस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं पसरेल आणि त्याच्याशी दोन हात करणे आरोग्य यंत्रणेला त्याला तोंड देणे कठीण जाईल, अशी भीती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत होती. कोरोनामुळं धारावीत पहिल्यांदा आढळून आलेल्या रुग्णांचा 1 एप्रिल 2020 रोजी मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
- Mumbai Corona Update : दोन वर्षानंतर नव्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत, मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मोठा दिलासा!
- Maharashtra Unlock : राज्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता; दोन दिवसात निर्णय
- Mumbai Local : लोकल ट्रेन, मॉल्स येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट