Mumbai Corona Update : आजही मुंबईतील रुग्णसंख्येत घट, 5 हजार 956 नवे कोरोनाबाधित
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या कालच्या तुलनेत कमी आढळली आहे. मागील 24 तासांत 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Mumbai Coronavirus Cases : कोरोना (Corona) महामारीने यंदा मुंबईकरांच्या नववर्षाची सुरुवातच भितीच्या छायेखाली केली. नववर्षाच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. पण मागील काही दिवसांत ही रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रशासन आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. आजही रुग्णसंख्ये घट झाली असून मुंबईत मागील 24 तासांत 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तर नव्या बाधितांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोनामुक्त झाले असून एकूण 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 5 हजार 556 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 469 झाली आहे. तर 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आतापर्यंत 9 लाख 35 हजार 934 मुंबईकरांनी कोरोनावर मात झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 93 टक्क्यांवर पोहचला आहे.
मुंबईत नव्याने आढळलेल्या 5 हजार 556 रुग्णांपैकी 479 रुग्ण रुग्णालयात असून इतर घरुन उपचार घेत आहेत. ज्यामुळे पालिकेकडे 38 हजार 140 खाटांपैकी 5 हजार 628 खाटाच केवळ वापरल्या गेल्या आहेत.
मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
5 जानेवारी | 15166 |
6 जानेवारी | 20181 |
7 जानेवारी | 20971 |
8 जानेवारी | 20,318 |
9 जानेवारी | 19474 |
10 जानेवारी | 13,648 |
11 जानेवारी | 11,647 |
12 जानेवारी | 16,420 |
13 जानेवारी | 13, 702 |
14 जानेवारी | 11, 317 |
15 जानेवारी | 10, 661 |
16 जानेवारी | 7, 895 |
17 जानेवारी | 5, 956 |
संबंधित बातम्या
ओमायक्रॉनच्या संकटात 1300 महिलांची सुरक्षित प्रसूती; BMC कडून विशेष दक्षता
TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha