एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MLC Election : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी रस्सीखेच सुरु; नेत्यांची डोकेदुखी वाढणार? लॅाबिंगला सुरुवात

Maharashtra Legislative Council : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका होणार असून अनेकांच्या नजरा या निवडणुकीवर लागल्या आहेत.

Maharashtra Legislative Council :  राज्यात येत्या काही महिन्यात विधान परिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. विधान परिषदेच्या या 10 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.  या जागांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आतापासूनच लाँबिंगला सुरुवात केली आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. तर, महापालिका निवडणुकांबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे अनेकांनी विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अवघ्या काही जागांसाठी डझनभर नेते इच्छुक आहेत. 

विधान परिषदेच्या आमदार निवडणुकीचे गणित काय?

येत्या जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची एक जागा रिक्त होत आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत निवडणुक होऊ शकते.  विधानपरिषदेवर सध्या भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 1 सदस्य आहेत. 

विधानपरिषदेच्या एका सदस्य निवडीसाठी 27 मतांची गरज असते. विजयाच्या सुरक्षित मतांसाठी हा आकडा 29 मतांचा पकडला जातो. विधान परिषदेतील 27 मतांप्रमाणे बलाबल लक्षात घेता भाजपच्या 4, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळू शकतो. तर, उरलेल्या एका जागेसाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस रंगण्याची शक्यता आहे. 

कोणाला संधी मिळणार?

विधान परिषदेतील दहा जागांसाठी सर्वच पक्षात चढाओढ सुरु झाली आहे. वरिष्ठासोबत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींवर आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीतल्या अनेक दिग्गजांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. 

शिवसेनेत अनेक नेत्यांना परिषदेचं गाजर दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेने सुभाष देसाईंना पुन्हा संधी देणार का मिलिंद नार्वेकर यांना आमदारकी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय  सचिन अहिरांसारख्या चेहऱ्यांना संधी देऊन शिवसेना शब्द पाळणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशीच काहीशी परिस्थिती भाजप आणि राष्ट्रवादीतही दिसून येत आहे. प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेते आहेत. तर रामराजे निंबाळकर सभापती आहेत.  या दोन्ही पक्षात अनेक नवे चेहरे विधान परिषदेच्या तिकिटासाठी रांगेत उभे असून दावा करत आहेत. 

या आमदारांची मुदत संपली

विधान परिषदेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या किती आमदारांना पुन्हा संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, संजय दौंड  आदी सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथPM Narendra Modi Threaten :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकीChhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल,  छगन भुजबळांची माहितीSanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
Embed widget