एक्स्प्लोर

ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार : आदित्य ठाकरे

ऑक्टोबरच्या मध्यात सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु असल्याचं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. शिवाय कार्यालयीन कामकाजासाठी 24 तासांचा वापर करता येईल का? याचीही चाचपणी सुरु असल्याचं ते म्हणाले.

मुंबई : 15 ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे, असं मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं. प्रवासी संघटना, सर्वसामान्य जनता यांच्याकडून लोकल लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलता येतील का?, यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान महाविकास आघाडीतील कोणत्याही मंत्र्याने याबाबत अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. परंतु इतर प्रवाशांना बस, खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे बरेच तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे हे हाल टाळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार, असं प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहे. याविषीय आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीत भाष्य करत काही महत्त्वाचे संकेत दिले.

इतरांसाठीही मुंबई लोकल प्रवास सुरु करण्याबाबत विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

ते म्हणाले की, "ऑक्टोबरच्या मध्यात लोकल सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. प्रवासाच्या आणखी काही सुविधा सुरु करण्यावरही आमचा भर आहे. आम्ही अनेक गोष्टी वेळ घेऊन विचारपूर्वक सुरु करत आहोत. कारण एकदा सुरु केलेल्या गोष्टी आम्हाला पुन्हा बंद करायच्या नाहीत."

तसंच "सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही संख्या जास्त असल्याने आता लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संवाद सुरु आहे. लोकलची संख्या वाढवल्यावर अधिक जणांना प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा प्रवासाच्या इतर साधनांवरील ताण वाढेल," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा विचार आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि लोकसंख्येचा विचार कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचा विचार आहे. मुंबईत विविध प्रकारची कार्यालयं आहेत. त्यांच्या वेळा बदलण्याचं काम अवघड आहे. सध्या आम्ही विविध कार्यालयं, संकुलं आणि कार्पोरेट्सशी कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याविषयी चर्चा करत आहोत. कार्यालयीन कामासाठी संपूर्ण 24 तासांचा वापर करता येईल का याची चाचपणी सुरु आहे, जेणेकरुन लोकल सेवेवर ताण येणार नाही. असं झाल्यास ऑक्टोबरपर्यंत सगळ्यांसाठी लोकल सेवा सुरु होऊ शकते."

Aaditya Thackeray | ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार : आदित्य ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024Devendra Fadnavis Nagpur : प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - फडणवीसSanjay Raut On North Kolhapur : उत्तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सोडली नाही है दुदैवbunty shelke Vs Pravin Datake :मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके लढत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Satej Patil: मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Embed widget