एक्स्प्लोर
राज्य सरकारची जम्बो भरती, 72 हजार पदं भरणार, नोकरीची सुवर्ण संधी!
महाराष्ट्र शासन पदभरती : राज्याच्या विविध विभागात थोडीथोडकी नव्हे तर 72 हजार पदं भरली जाणार आहेत. त्यापैकी 36 हजार यंदा, तर 36 हजार पुढच्या वर्षी ही पदं भरली जाणार आहेत.
![राज्य सरकारची जम्बो भरती, 72 हजार पदं भरणार, नोकरीची सुवर्ण संधी! Maharashtra Government to give 72000 Jobs Planning To Recruit 36000 Post This Year राज्य सरकारची जम्बो भरती, 72 हजार पदं भरणार, नोकरीची सुवर्ण संधी!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/17195448/mantralay.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
महाराष्ट्र शासन पदभरती : मुंबई: राज्य सरकार जंबो भरती करणार आहे. राज्याच्या विविध विभागात थोडीथोडकी नव्हे तर 72 हजार पदं भरली जाणार आहेत. त्यापैकी 36 हजार यंदा, तर 36 हजार पुढच्या वर्षी ही पदं भरली जातील, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
विशेष म्हणजे कृषी खाते आणि कृषी खात्याशी संबंधित पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आता ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गाव पातळीवर कृषी विषयक कामे होत नसल्याची ओरड गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करुन, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे.
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण 72 हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असं जाहीर केलं होतं.
यंदा पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार पदभरती करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.
कोणत्या विभागात किती पदे भरणार?
- ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
- आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
- गृह विभाग- 7 हजार 111 पदे
- कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
- पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
- सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
- जलसंपदा विभाग- 827 पदे
- जलसंधारण विभाग- 423 पदे
- मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
- नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)