एक्स्प्लोर
कौमार्य चाचणीला तरुणाचा विरोध, कंजारभाट समाजाकडून कुटुंबावर बहिष्कार, सरपंचासह चौघांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी कंजारभाट जातपंचायतीच्या सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. यानंतर त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितल आहे.

ठाणे : आपला भारत देश ऐकविसाव्या शतकाच्या उबरठ्यावर आपल्या देशातल्या कंजारभाट समाजातल्या 'ती'ची मात्र अजूनही लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेतली जाते. ठाण्यातील अंबरनाथमध्ये कंजारभाट समाजातील कुटुंबाने कौमार्य चाचणीला विरोध केल्यामुळे कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंजारभाट जातपंचायतीच्या सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. Virginity Test | कौमार्य चाचणीच्या विरोधामुळे कुटुंबावर बहिष्काराचं प्रकरण | अंबरनाथ | एबीपी माझा अंबरनाथ शहरात राहणाऱ्या विवेक तमायचीकर या तरुणाने लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी करण्यास विरोध केला होता. यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कंजारभाट जातपंचायतीने सामाजिक बहिष्कार घातला. कंजारभाट जातपंचायतीने इतक्यावरच न थांबता, सोमवारी विवेक याच्या आजीचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या अंत्यविधीला समाजातील कुणीही न जाण्याचं फर्मान जातपंचायतीने सोडलं. याप्रकरणी तमायचीकर यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी कंजारभाट जातपंचायतीचे सरपंच संगम गारुंगे याच्यासह चार जणांवर सामाजिक बहिष्कारविरोधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितल आहे. राज्य सरकारने जात पंचायतीच्या विरोधात कायदा संमत केला, मात्र तरीही मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार या समाजात मांडला जात आहे. स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या प्रथेला मूठमाती द्यायला हवी. अर्थात त्यासाठी समाजातील उच्चशिक्षित तरुणांनी पुढं यायला हवं. VIDEO | कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीची कीड कधी संपणार? | स्पेशल रिपोर्ट | पुणे | एबीपी माझा संबंधित बातम्या कंजारभाट समाजात उच्चशिक्षित कुटुंबाकडून वधूची कौमार्य चाचणी कौमार्य चाचणी प्रथेविरोधात व्हॉट्सअॅप ग्रुप चालवणाऱ्या तरुणांना मारहाण व्हर्जिनिटी टेस्ट राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळणार, निर्णय घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य सामाजिक बहिष्कार प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश
आणखी वाचा























