एक्स्प्लोर

Nana Patole : शरद पवारांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंचं भाष्य, म्हणाले...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar)यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवारांशी काँग्रेस नेत्यांच्या भेटीसंदर्भात नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षाची स्टॅटर्जी आहे. त्यानुसार आमचे प्रभारी आणि नेते शरद पवारांना भेटायला गेले. ओबीसी आरक्षण जे भाजपनं संपवलं आहे. त्याविरोधात आम्ही एक आंदोलन उभं करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत भूमिका केंद्राकडून स्पष्ट झाली पाहीजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे नेते शरद पवारांना भेटायला गेले होते, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, मला तिथं आमचे नेते गेलेले माहितीही नव्हतं. मला आमंत्रणही नव्हतं. माझा कुणावर व्यक्तिगत राग नाही. मला माझ्या पक्षाचं काम करायचं आहे. माझ्या पक्षाचं काम करताना कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही, असंही नाना पटोले म्हणाले. 

'वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा', नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी!

...म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत
नाना पटोले म्हणाले की, हायकमांडने मला पक्ष  मजबुत करण्याची जबाबदारी दिली ती मी पार पाडणार आहे. मी काही शिवसेना- राष्ट्रवादीविरोधात अॅटॅक करत नाही. भाजप विरोधात करतो. ते म्हणाले की, 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. काँग्रेस मरणासन्न अवस्थेत आजीबातच नाही, संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते, असं नाना पटोले म्हणाले. 

Sharad Pawar : विधानसभा अध्यक्षपद कुणाचं? शरद पवारांचं मोठं वक्तव्य... 

झोटिंग समितीच्या अहवालाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी बहुजन समाजाच्या नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. एकनाथ खडसेंचं याच कारणामुळे खच्चीकरण झालं आहे.  एखाद्या गोष्टीचा फार्स तयार करुन त्यात लोकांना गुंतवायचं हे फडणवीसांना जमतं. झोटींग समितीचा अहवाल देखील फार्सच आहे, असं ते म्हणाले. 

Sharad Pawar : पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य 

उद्या सायकलवरुन राज्यपालांना भेटायला जाणार

नाना पटोले यांनी सांगितलं की, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर उद्या राज्यापालांना दुपारी 12 वाजता सायकल वरुन राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. हॅगींग गार्डन ते राजभवन पर्यंत सायकल रॅली काढणार आहोत, असं ते म्हणाले. सामनातील लेखाविषयी बोलताना ते म्हणाले की, सामनानं चांगलं लिहीलंय काँग्रेसच्या हिताचंच सांगितलंय. 2024 मध्ये देशात राहुल गाधींच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल. नानांनी काँग्रेसला महाराष्ट्रात उभारी दिलीय असं म्हटलं आहे, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळातील काँग्रेस मंत्र्यांच्या बदल्यांबाबत अजून निर्णय नाही. मंत्रिमंडळ बदलाचे निर्णय हायकमांड घेतील, असं ते म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
Raj Thackeray 2008 Railway Case: गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
 Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यानंतर RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
Embed widget