एक्स्प्लोर

'वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा', नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.  काल शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वर बैठक झाली.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.  काल शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वर बैठक झाली. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तुम्ही वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा. आम्हालाही तयारीला लागता येईल असं ते म्हणाले. जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसंही सांगा, असं शरद पवार म्हणाले असल्याची माहिती आहे. शरद पवार म्हणाले की, पक्ष वाढवण्यासंदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला नाना पटोले मात्र गैरहजर होते. 

Sharad Pawar : विधानसभा अध्यक्षपद कुणाचं? शरद पवारांचं मोठं वक्तव्य... 

शरद पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटलं होतं की, नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी भाष्य केलं असतं असा टोला देखील त्यांनी लगावला होता.  विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील.  त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही
कॉंग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले होते की,  प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही.  त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. त्यांनी भूमिका घेतली, यात काहीही चुकीचं नाही.  आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो.   प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही.  सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे.. ते एक विचारानं काम करतात, असं ते म्हणाले. 

Sharad Pawar : पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य 

काय म्हणाले होते नाना पटोले 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी आपण हे वक्तव्य केंद्राला उद्देशून केलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
Thane News : वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Devendra Fadnavis : नेहरू अन् मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रिया म्हणाले, 'कुठलीही स्पर्धा नाही. खरं म्हणजे केवळ...'
नेहरू अन् मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रिया म्हणाले, 'कुठलीही स्पर्धा नाही. खरं म्हणजे केवळ...'

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Embed widget