एक्स्प्लोर
Advertisement
पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात काँग्रेसचं सोमवारी राज्यभर आंदोलन
कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आरोप केले.
मुंबई : पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे मात्र आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसूली करत आहे, असा आरोप महाराष्ट्र कॉंग्रेसनं केला आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉंग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात सहभागी होऊन चीन सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आरोप केले.
प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, चीनने आपल्या सैनिकांवर केलेला हल्ला काळजी करणारा आहे. आज परत बातमी आहे की चीन सैनिकांनी आपल्या भागात तंबू टाकले आहेत. पेट्रोलचे दर रोज वाढत आहेत. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत, असं थोरात यांनी सांगितलं.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, चिनी सैनिक तंबू बांधण्याचं आणि बंकर बांधण्याचं काम करत आहेत अशी माहिती आली आहे. पंतप्रधानांनी विरोधी पक्षाच्या बैठकीत गंभीर वक्तव्य केलं की भारतात कोणीही घुसलेलं नाही असं वक्तव्य का केलं? याचा चीन गैरफायदा घेत आहे. असं का उत्तर दिलं याच त्यांनी अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही.
चीनचे पंतप्रधान आणि आपले पंतप्रधान यांची चांगली मैत्री आहे. ते 19 वेळा भेटले आहेत. अहमदाबादला त्यांचा सत्कारही केला. चीनच्या पंतप्रधान यांना न दुखवण्यासाठी आपले पंतप्रधान असं वक्तव्य करत आहेत का? असा सवाल चव्हाण यांनी केला.
पंतप्रधान यांनी केलेला दावा अतिशय खोटा आहे. चीनने मोठे रस्ते आणि पूल बांधण्याचं काम सुरू केलं आहे. पूर्व लडाखमध्ये 10 हजार सैनिक आहेत हे खरं आहे का? भारतीय सैनिकांचं मनोधैर्य कमी करण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. याचा चीनला फायदा होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
चव्हाण म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेले 21 दिवस झाले रोज वाढत आहेत. शेतकरी शेतीच्या कामासाठी डिझेल वापरतात मात्र ते आता महाग झालं आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे. आपलं केंद्र सरकार कर लाऊन लोकांकडून वसूल करत आहे. सरकारने एक्साईज कर कमी केला पाहिजे. याचा आम्ही निषेध करतो, असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement