एक्स्प्लोर

'मुख्यमंत्री ठाकरेंनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली', किरीट सोमय्या केंद्रीय निवडणूक आयोगात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा आरोप करत किरीट सोमय्या केंद्रीय निवडणूक आयोगात गेले आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सोमय्यांनी अठरा कागदपत्र साडेतीनशे पानांची सुपूर्द केले.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा आरोप करत किरीट सोमय्या केंद्रीय निवडणूक आयोगात गेले आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सोमय्यांनी अठरा कागदपत्र साडेतीनशे पानांची सुपूर्द केले. लवकरच ह्या बाबतीत निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागू शकतो असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

प्रकरण सिद्ध झाले तर केवळ आमदारकीच जाणार नाही तर अफरातफरीचा सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल, असा आरोप सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. भाई ठाकूर यांच्या प्रकरणाचा संबंध संजय राऊत यांच्याशीही आहे. संजय राऊत आणखी एका माध्यमातून पीएमसी घोटाळ्याशी जोडले आहेत, असा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात 19 घरे जी 23 हजार 500 स्केअर फूटाची आहेत ती दाखविलेली नाहीत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन याआधी केला होता. त्याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.

शाहिद बालवा, अविनाश भोसले बिल्डर्सना ठाकरे सरकारचे नवीन वर्षाचे गिफ्ट, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

सोमय्या यांनी सांगितलं होतं की, रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने या प्रतिज्ञापत्रकात फक्त अन्वय नाईक कुटुंबाकडून तीस जमिनी (सात बारा) चे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ठाकरेंनी भासवले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात 19 घरे जी 23 हजार 500 स्केअर फूटाची आहेत. ज्याची किंमत 5.29 कोटी आहे. ती दाखविलेली नाही. ठाकेंनी ही एवढी घरे, संपत्ती ही जनतेपासून लपवली, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 11 नोव्हेंबर, 2020 रोजी उद्धव ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक कुटुंब यांचे जमिनी संबंधी आर्थिक व्यवहारासंबंधीचा खुलासा केला होता. शिवसेनेच्या डझनभर नेत्यांनी मला धमक्या दिल्या होत्या, असा दावाही सोमय्यांनी केला होता.

CM Uddhav Thackeray Asset Discrepancy: उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवली, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार : सोमय्या

हे मिशन सुरुच राहणार : किरीट सोमय्या उद्धव ठाकरे कुटुंबाचे अपारदर्शक जमिनी, बिल्डर, आर्थिक व्यवहार जनतेपुढे आणण्याचे मिशन सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 11 नोव्हेंबर 20 रोजी ठाकरे, नाईक परिवाराचे जमिन व्यवहार उघडकीस आणल्यानंतर 12 नोव्हेंबर, 2020 ला रश्मी उद्धव ठाकरे यांनी 21 मार्च, 14 ते 12 नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या त्या जमिनीवरील 19 घरांचा, घरपट्टी कर व अन्य कर ताबडतोब आरटीजीएसद्वारे सरकारी खात्यात, कोर्लई ग्रामपंचायत यांच्या खात्यात भरला. असा दावाही सोमय्यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget