(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Loudspeakers Controversy : लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सरकार बोलवणार सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंनाही देणार आमंत्रण
Loudspeakers Controversy : राज्य सरकार लवकरच लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
Loudspeakers Controversy : लवकरच लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावणार असून या बैठकीला राज ठाकरे यांनाही बोलवणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून आज वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, लाऊडस्पीकरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहोत. या सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कायदा हाती घेतल्यास...
गेल्या काही दिवसांपासून राज्यांत कायदा आणि सुव्यस्स्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कायदा हातात घेऊ अन्यथा कठोर कारवाई करू असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
वातावरण चिघळवण्यासाठी प्रयत्न सुरू
गृह खात्याकडे विविध ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.
लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच
लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्याअनुषंगाने सन 2015 आणि सन 2017 मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊडस्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद पोलीस निर्णय घेतील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पुढील महिन्यात जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या सभेला परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी केली आहे. राज यांच्या सभेमुळे औरंगाबादमधील वातावरण अधिक तणावाचे होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेबाबत औरंगाबाद पोलीस स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतली असे त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Loudspeakers Demand Rise : भोंग्याचा वादाने दुकानदारांचे अच्छे दिन; भोंग्यांच्या विक्रीत ३० ते ४० टक्के वाढ
- Mumbai : ध्वनी प्रदुषण आणि लाऊडस्पीकर संदर्भात हायकोर्टात अवमान याचिका, तातडीनं सुनावणीस हायकोर्टाचा नकार, 14 जूनला सुनावणी
- Mumbai Police : मुंबई पोलिसांनी तब्बल 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या, जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर