एक्स्प्लोर
नवी मुंबईत व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, 2 कोटींचा ऐवज लुटला
6 दरोडेखोर कुरीअर एजंटचं सोंग घेऊन घरात शिरले आणि त्यांनी व्यापारी मेनकुदळे आणि त्यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून घरातली रक्कम आणि दागिने लुटले

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या एपीएमसीचे व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 2 कोटींचा ऐवज लुटला. रात्री 9च्या सुमारास 6 दरोडेखोर कुरीअर एजंटचं सोंग घेऊन घरात शिरले आणि त्यांनी मेनकुदळे आणि त्यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून घरातली रक्कम आणि दागिने लुटून नेले. दरोडेखोरांच्या टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं समजतं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा























