एक्स्प्लोर

Lockdown | 10 मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल : सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परीक्षा, लॉकडाऊन, उद्धव ठाकरे यांसारख्या विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केलं

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच 10 मे पर्यंत राज्यातील परीक्षांचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं.

"लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवावा. येत्या 10 मेपर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. ते यावर काम करत आहेत आणि लवकरच चित्र स्पष्ट होईल," असं खासदार सुळे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र उद्धव ठाकरेंकडे मोठा भाऊ म्हणून पाहतोय महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. फेसबुकवर संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, "आज उद्धव ठाकरेंकडे राज्यातील जनता मोठा भाऊ म्हणून पाहतेय, याचा आनंद आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री चांगलं काम करत आहेत." तसंच महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन शिथिल करण्याचा सरकारचा विचार लॉकडाऊन शिथिल होण्याची मीही तुमच्याप्रमाणेच वाट पाहत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय केंद्र सरकारही लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु लॉकडाऊन घाईगडबडीत उठवून चालणार नाही, ते टप्प्याटप्प्याने उठवलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉकिंग हळूहळू सुरु झालं पाहिजे असं मत व्यक्त करताना लोकांना काम हवं असल्याचंही त्या म्हणाल्या.

पर्यावरणाबाबत संवेदनशील राहा पर्यावरणाबाबत आपल्याला अधिक संवेदनशील राहावं लागेल. आपण आपल्या पातळीवर पर्यावरणासाठी योगदान द्यायला हवं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. टीबीमुळे राज्यात महिन्याला एक लाख लोक दगावतात. त्यामुळे खबरदारी घ्यायला हवी. यासाठी रस्त्यावर न थुंकण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर एक कॅम्पेन करणार असल्याचं सांगत जनतेनेही अशी मोहीम सुरु करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या

अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget