एक्स्प्लोर
मुंबईः लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईः लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन स्लो मार्गावर, हार्बर रेल्वेमार्गावर नेरुळ ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते माहीम दरम्यान देखभालीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
मेगाब्लॉकमुळे तिन्ही मार्गांवरील गाडय़ा नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबाने धावतील. तसेच, काही गाडय़ा रद्द करण्यात येणार असल्याने गाडय़ांना गर्दीही असेल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेः
माटुंगा ते मुंलुंड डाऊन स्लो मार्ग, सकाळी 11.30 ते 4.30 वाजेपर्यंत
हार्बर लाईनः नेरुळ ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर, सकाळी 11.10 ते 4.10 वाजेपर्यंत
पश्चिम रेल्वेः
सांताक्रुझ ते माहीम फास्ट मार्ग, सकाळी 10.35 ते 3.35 वाजेपर्यंत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement