Mega Block : मुंबईकरांना दिलासा! रविवार लोकल ट्रेनने प्रवास करताय? कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नाही
Local Train Mega Block : रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि रेल्वेने प्रवास करण्याच्या विचारात असाला तर, घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करून घ्या.
Mumbai Local Mega Block, 25 February : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. आज रविवारी 25 फेब्रुवारीला कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही आज लोकल प्रवास करणार असाल, तर तुम्हाला रेल्वेच्या वेळापत्रकावर अवलंबून राहावं लागणार नाही. मध्य रेल्वेकडून तिन्ही मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.
कोणत्याही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही
मध्य रेल्वेकडून शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला.
- माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग 24 फेब्रुवारी रात्री 00.30 वाजेपासून 25 फेब्रुवारीला 04.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला.
- ब्लॉक कालावधीत, अप जलद मार्गावरील सेवा त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार मुलुंड स्थानकावरुन अप धीम्या मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान वळवण्यात येतील आणि माटुंगा येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या.
हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक नाही
पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन 24 फेब्रुवारी 00.40 पासून 25 फेब्रुवारी 04.40 पर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर पोर्ट लाईन वगळून) मेगाब्लॉक घेण्यात आला. रविवारी 4.40 पासून पुढील लोकल नेहमीप्रमाणे धावतील.
25 फेब्रुवारीला 03.55 पासून (बेलापूर लोकल) सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि 25 फेब्रुवारीला 04.27 पर्यंत (पनवेल लोकल) आणि पनवेल/बेलापूरसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 24 फेब्रुवारीच्या 00.40 पर्यंत सुटतील. 25 फेब्रुवारीच्या 04.40 मधील लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.
24 फेब्रुवारीच्या 04.33 पर्यंत पनवेल येथून सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून 00.05 वाजता ठाण्याहून पनवेलकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
डाऊन हार्बर मार्ग
रात्रकालीन मेगा ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 04.32 वाजता सुटली आणि 25 फेब्रुवारी रोजी पनवेल येथे 5.52 वाजता पोहोचली.
अप हार्बर मार्गावर
पनवेल येथून सुटणाऱ्या ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल 04.49 वाजता होती आणि 25 फेब्रुवारीला 06.08 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचली.
डाउन ट्रान्स-हार्बर मार्ग
रात्रकाली ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने ठाणे येथून सुटणारी पहिली लोकल 05.12 वाजता आणि 25 फेब्रुवारी रोजी 06.04 वाजता पनवेल येथे पोहोचेली.
अप ट्रान्स हार्बर मार्ग
ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून 04.53 वाजता आणि 25 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे 05.45 वाजता पोहोचली.
रात्रकालीन ब्लॉक संपल्यानंतर रविवारी सर्व गाड्या नियमित वेळेत धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.