एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ED Raids LIVE UPDATES | आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग ईडी कार्यालयात दाखल

अंमलबजावणी संचालनालयाची पथकं आज सकाळी आठ वाजता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचली आणि शोधमोहीम सुरु केली. मुंबई, ठाणे परिसरातील दहा ठिकाणी ईडीकडून शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई केली जात आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे.

LIVE

ED Raids LIVE UPDATES | आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग ईडी कार्यालयात दाखल

Background

ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं.  याचाच वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे.

राजकारणासाठी अशा संस्थांचा वापर : बाळासाहेब थोरात
प्रताप सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरु केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अशा संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो," असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला. "भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. परंतु भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्रास होतो," असंही थोरात म्हणाले.

प्रताप सरनाईक यांची कोणकोणत्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका 

- शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील माजीवडा मतदारसंघातून सलग तीन टर्म आमदार आहेत.
- मीरा-भाईंदर परिसराची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
- प्रताप सरनाईक सातत्याने भाजपविरोधात आक्रमक पद्धतीने बोलत असतात
- कलर्स चॅनलच्या बिग बॉसमध्ये गायक कुमार सानू यांचा पुत्र जान सानूने मराठी भाषेविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला आहे.
- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला होता.
- मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणारी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

टॉप ग्रुपशी संबंधित प्रकरणावरुन सरनाईकांच्या घरी ईडी : सूत्र
राहुल नंदा यांच्या टॉप्स ग्रुपवर सुमारे 350 कोटी रुपये हवालामार्फत देशाबाहेर नेल्याचा आरोप आहे. राहुल नंदा सध्या आपल्या कुटुंबासह दुबईमध्ये असल्याची माहिती आहे. ईडीच्या माहितीनुसार राहुल नंदा यांनी लॉकडाऊनदरम्यान चार राष्ट्रीयकृत बँकांकडून सुमारे 175 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी कर्ज घेतलं. याशिवाय मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैस जमा न करता तो पैसा आपल्या दुसऱ्या कंपनीत गुंतवला. अशाप्रकारे 100 कोटी रुपयांची संपत्ती देश आणि देशाबाहेर जमा केली आहे. टॉप्स कंपनीला त्यांच्या क्लायंटकडून मिळालेले सुमारे 75 कोटी रुपये आपल्या खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करुन तो पैसा परदेशी बँकांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांची मैत्री आहे. ईडीला मिळालेल्या माहितीनुसार दोघांवर काही आर्थिक संबंध आहेत का याचा तपास ईडी करत आहे.

संबंधित बातमी

ईडी आणि इतर यंत्रणांनी राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये : संजय राऊत

14:44 PM (IST)  •  24 Nov 2020

राहुल नंदा यांच्या टॉप्स ग्रुपवर सुमारे 350 कोटी रुपये हवालामार्फत देशाबाहेर नेल्याचा आरोप आहे. राहुल नंदा सध्या आपल्या कुटुंबासह दुबईमध्ये असल्याची माहिती आहे. ईडीच्या माहितीनुसार राहुल नंदा यांनी लॉकडाऊनदरम्यान चार राष्ट्रीयकृत बँकांकडून सुमारे 175 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी कर्ज घेतलं. याशिवाय मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैस जमा न करता तो पैसा आपल्या दुसऱ्या कंपनीत गुंतवला. अशाप्रकारे 100 कोटी रुपयांची संपत्ती देश आणि देशाबाहेर जमा केली आहे. टॉप्स कंपनीला त्यांच्या क्लायंटकडून मिळालेले सुमारे 75 कोटी रुपये आपल्या खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करुन तो पैसा परदेशी बँकांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांची मैत्री आहे. ईडीला मिळालेल्या माहितीनुसार दोघांवर काही आर्थिक संबंध आहेत का याचा तपास ईडी करत आहे.
14:34 PM (IST)  •  24 Nov 2020

आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना, बलार्ड पियर परिसरातील कार्यालयात विहंग यांची चौकशी होण्याची शक्यता
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलंEknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Embed widget