एक्स्प्लोर
विरार रेल्वे स्थानकात लोकलमध्ये जिवंत काडतूस
रेल्वे सुरक्षा दलाने सामानाची पिशवी आपल्या कार्यालयात आणली आणि पिशवीची तपासणी केली असता, त्यात जिवंत काडतूस सापडलं,
विरार : विरार रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्लास्टिक पिशवीत सोमवारी जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली. काल 6 ऑगस्ट रोजी विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर दुपारी 4 वाजून 03 मिनिटांची विरार-दादर ही लोकल उभी होती. याच लोकलच्या डब्ब्यात एक प्लास्टिकची पिशवी असल्याची माहिती एका प्रवाशाने विरारच्या रेल्वे सुरक्षा दलाला दिली.
रेल्वे सुरक्षा दलाने सामानाची पिशवी आपल्या कार्यालयात आणली आणि पिशवीची तपासणी केली असता, त्यात जिवंत काडतूस सापडलं, तसंच बॉम्ब असल्याच्या अफवा उडाली. यानंतर आरपीफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, श्वान पथक यांच्यासह बॉम्ब शोध पथकाने तपासणी केली असता, बॉम्ब नसल्याचं स्पष्ट झालं.
मात्र हे सामान कुणाचं आहे, कोणी ठेवलं होतं, याचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरु आहे. या सर्व घटनेची प्रशासनाने माहिती पूर्णत: गोपनीय ठेवण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
करमणूक
नाशिक
Advertisement