एक्स्प्लोर
Advertisement
झगमगणारं सीएसएमटीही काळोखात, वाजपेयींना अनोखी श्रद्धांजली
अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या सीएसएमटीची इमारतीवरचा झगमगाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. वाजपेयींना संपूर्ण देशभरातून श्रद्घांजली देण्यात येतेय. त्याचप्रमाणे मुंबईतही अनेक ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. नेहमीप्रमाणे झगमगाटाने उजळून निघणारं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस काल (गुरुवारी) रात्री मात्र शांत असलेलं पहायला मिळालं.
अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या सीएसएमटीची इमारतीवरचा झगमगाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दररोज प्रकाशाने उजळून निघणारी सीएसएमटीची इमारत काल मात्र शांत असलेली पहायला मिळाली.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर काल (गुरुवारी) संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते. राष्ट्रीय दुखवटा जाहीर वाजपेयी यांच्या निधनामुळं देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर देशातील सर्व भाजप कार्यालयावरून झेंडे निम्म्यावर आणण्यात आलेत. आज (शुक्रवारी) दुपारी 4 वाजता राष्ट्रीय स्मृतीस्थळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संबंधित बातम्या राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या? अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय? अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं? हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार#Mumbai: Lights of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus railway station (CMST) to remain off today as a mark of respect to the departed soul of former PM #AtalBihariVajpayee. pic.twitter.com/pjCCz5LxmP
— ANI (@ANI) August 16, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement