एक्स्प्लोर
Advertisement
ठाण्याच्या उपवन परिसरात रहिवासी भागात बिबट्याची दहशत
ठाण्याच्या उपवन परिसरात काल मध्यरात्री एका निवासी इमारतीच्या परिसरात बिबट्या दिसला. बिबट्याचा वावर परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, यामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे.
ठाणे : ठाण्याच्या उपवन परिसरात काल मध्यरात्री एका निवासी इमारतीच्या परिसरात बिबट्या दिसला. बिबट्याचा वावर परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, यामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे.
ठाण्याच्या उपवन परिसरात कॉसमॉस हिल्स नावाची इमारत आहे. ही इमारत येथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अगदी लागून आहे. भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या या इमारतीच्या संरक्षक भिंतीवरुन चालताना स्पष्टपणे दिसून येतो.
काही महिन्यांपूर्वी देखील येथील रहिवाशांना बिबट्या दिसला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने येथील रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण आहे.
दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भितीचं वातावरण असून, इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या लहान मुलांना खेळायला पाठवणं बंद केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement